Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: नांदा येथील सरकारी जागेवरील 'ते' बेकायदेशीर बांधकाम पाडा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मनसेचे प्रकाश बोरकर यांची मागणी अल्लाउद्दीन सिद्दीकी यांच्याविरोधात कारवाईची मागणी आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स नांदा - सध्या नांदा गाव हे...

  • मनसेचे प्रकाश बोरकर यांची मागणी
  • अल्लाउद्दीन सिद्दीकी यांच्याविरोधात कारवाईची मागणी
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
नांदा -
सध्या नांदा गाव हे वेगवेगळ्या बेकायदेशीर बांधकामाने चर्चेत येत आहे. आता तर सरास सरकारी जागेवर अल्लाउद्दीन शमशुद्दिन सिद्दीकी यांनी बांधकाम सुरू केले असल्याचे मनसेचे बोरकर यांनी म्हटले आहे. नांदा ग्रामपंचायत हद्दीतील ५ ते ६ गुंठे जागेवर सदर व्यक्तीने अतिक्रमण केले असून याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मनसेचे प्रकाश बोरकर यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग, ठाणेदार पो.स्टे. गडचांदूर यांचेकडे लेखी तक्रारीतून केली आहे. मागील २ महिन्यापासून त्या वादग्रस्त जागेवर पिलर पर्यंतचे पक्के बांधकाम सुरू केले असून सार्वजनिक वापराच्या शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण पाडणे गरजेचे असल्याचे मत बोरकर यांनी मांडले.

नांदा गावालगत अल्ट्राटेक सिमेंट कंपनी आहे त्यामुळे गावात नेहमी वाहतुकीची वर्दळ असते. विशेष म्हणजे सदरचे वादग्रस्त बांधकाम गडचांदूर - अंतरगाव मार्गावर असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने सदरचे बेकायदेशिर बांधकाम तोडण्याचा नोटीस दिला असल्याची माहिती बोरकर यांनी दिली. शासकीय जागेवर झालेले अतिक्रमण बेकायदेशीर असून प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. आता, प्रशासन नेमकी काय कारवाई करेल याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.



About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top