Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: क्षयरोगाविरुद्ध लढ्यात सामाजिक सहभागाचे उदाहरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
राजुरातील साळवे स्वस्त औषधी सेवेकडून सहा रुग्णांना पोषण किट आमचा विदर्भ - राजुरा (दि. ०९ मार्च २०२६) -         राजुरा तालुक्यातील साळवे स्वस...
राजुरातील साळवे स्वस्त औषधी सेवेकडून सहा रुग्णांना पोषण किट
आमचा विदर्भ - राजुरा (दि. ०९ मार्च २०२६) -
        राजुरा तालुक्यातील साळवे स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअर्स यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त एक सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिवती तालुक्यातील क्षयरोग (टीबी) रुग्णांना पोषण आहार किट देण्यात आले. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असून तो एक गंभीर सामाजिक समस्याही मानला जातो. भारतामध्ये क्षयरोग हे सार्वजनिक आरोग्यासमोरील मोठे आव्हान मानले जाते. दरवर्षी देशात सुमारे 26 लाख नवीन टीबी रुग्ण आढळून येतात, तर त्यापैकी सुमारे 4.4 लाख रुग्णांचा मृत्यू होतो. शासनाकडून टीबी रुग्णांना मोफत औषधोपचार दिले जातात तसेच रुग्णांना दरमहा एक हजार रुपयांची आर्थिक मदतही दिली जाते. मात्र रुग्णांना सकस व पोषणयुक्त आहार मिळणे अत्यंत गरजेचे असल्याने शासनाने सामाजिक संस्था आणि समाजातील दानशूर व्यक्तींना टीबी रुग्णांना पोषण आहार किट देण्याचे आवाहन केले आहे.

        या आवाहनाला प्रतिसाद देत साळवे स्वस्त औषधी सेवा जेनेरिक मेडिकल स्टोअर्सच्या संचालिका माधुरी साळवे यांनी दोन टीबी रुग्णांना पोषण आहार किट दिले. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद लहुजी साळवे यांनी दोन पोषण किट देऊन या उपक्रमात सहभाग नोंदविला. यासोबतच वाढदिवसानिमित्त हर्ष बजरंग जेणेकर, राजुरा यांनीही दोन पोषण किट देऊन सामाजिक बांधिलकी जपली. अशा प्रकारे एकूण सहा पोषण आहार किट जिवती तालुक्यातील टीबी रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. ही पोषण आहार किट वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक सचिन शरद बरडे यांच्या माध्यमातून संबंधित टीबी रुग्णांपर्यंत पोहोचवण्यात आली.

        या उपक्रमाबद्दल तालुका आरोग्य अधिकारी डॉ. टेंभे यांनी साळवे व जेणेकर परिवाराचे आभार मानले. क्षयरोग निर्मूलनासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येऊन अशा प्रकारे सहकार्य करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

#जागतिकमहिलादिन #TBमुक्तभारत #RajuraNews #JivatiNews #SalveSwasthAushadhiSeva #TBPatientsSupport #NutritionKitDistribution #MadhuriSalve #PramodSalve #HarshJenekar #PublicHealthIndia #ChandrapurNews #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top