Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: “रुग्णसेवेतून फार्मसिस्ट दिनाला खरी ओळख”
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
फार्मसिस्ट दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप; केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचा आदर्श उपक्रम आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 26 सप्टेंबर२०२५) - ...
फार्मसिस्ट दिनानिमित्त रुग्णांना फळवाटप; केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचा आदर्श उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 26 सप्टेंबर२०२५) -
        दिनांक २५ सप्टेंबर रोजी गुरुवारी जागतिक स्तरावर साजरा होणाऱ्या फार्मसिस्ट दिनानिमित्त राजुरा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेतर्फे उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रुग्णांना फळवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक जाधव यांच्या उपस्थितीने विशेष महत्व लाभले. या उपक्रमात चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीतील संघटन सचिव प्रशांत गोठी, तालुका अध्यक्ष कैलाश रेगुंडवार, सचिव राकेश अल्लूरवार, माजी तालुकाध्यक्ष संदीप जैन, गोपाल सारडा, हितेश डाखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. फार्मसिस्ट वर्गातून अनिल  आवारी, निलेश आवारी, अभय पोशटटीवार, दिनकर काळे, शेखर आबंटकर, कमल बजाज, स्वप्नील पिंपळकर, नावेद अंसारी, प्रशांत उमरे, मनोज सदाफळे, जयप्रकाश सारडा, प्रितम घटे, मनीष बांबोडे, प्रवीण मडावी व अमोल चोथले यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. या सामाजिक उपक्रमाद्वारे रुग्णांना सेवा देण्याबरोबरच फार्मसिस्ट दिनाचे महत्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.

#PharmacistDay #Rajura #Healthcare #PatientCare #ChandrapurNews #CommunityService #ChemistsAndDruggists #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top