Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पत्रकारितेवर गदा आणणाऱ्या ठाणेदारावर कारवाईची मागणी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो पत्रकारांचा संताप व्यक्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २७ सप्टेंबर २०२५) -         पत्रकारितेवर अं...
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो पत्रकारांचा संताप व्यक्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २७ सप्टेंबर २०२५) -
        पत्रकारितेवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नांचा आणखी एक धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात घडला आहे. पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश हिवसे यांनी भूमिपुत्राची हाक या न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे यांच्यावर मध्यरात्री गुन्हा दाखल केला. कुकडे यांनी अवैध धंद्यांविषयी उघड केलेल्या बातम्यांमुळे ही कारवाई केल्याचे आरोप आहेत.

         पत्रकारांवर अवैध धंदेवाईकांनी हल्ला करून मारहाण केली, तरी पोलीसांनी तक्रार नोंदवण्याऐवजी आरोपींना संरक्षण दिले. उलट सत्य मांडणाऱ्या पत्रकारावरच गुन्हा दाखल करण्यात आला. या अन्यायकारक कारवाईविरोधात इंडियन डिजिटल मिडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेकडो पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनात ज्येष्ठ पत्रकार किशोर पोतनवार यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पत्रकार उपस्थित होते. आंदोलनादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके यांना पत्रकारांनी घेराव घालून निवेदन दिले. ठाणेदार योगेश हिवसे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी तसेच आमदार किशोर जोरगेवार उपस्थित होते.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा
        भारतीय संविधानाचे कलम १९(१)(अ) हे प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देते. पत्रकारितेचे स्वातंत्र्य हा त्याचाच अविभाज्य भाग आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनेकवेळा पत्रकार स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे. महाराष्ट्र सरकारने पत्रकार संरक्षण अधिनियम २०१७ व पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ लागू केले असून, पत्रकारांवरील हल्ले व दडपशाही रोखणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. तरीही ठाणेदार योगेश हिवसे यांची कारवाई या कायद्यांचा उघड भंग करणारी ठरली आहे.

डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता नियमांचे उल्लंघन
        भारत सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम २०२१ नुसार डिजिटल न्यूज पोर्टलविरोधात थेट गुन्हा दाखल करता येत नाही. प्रथम संपादकाला तक्रार दिली जाते, त्यानंतरच मध्यस्थ संस्थेकडे प्रकरण वर्ग होते. या प्रक्रियेचे उल्लंघन करत गुन्हा नोंदवला. त्यामुळे संविधान, सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शक तत्त्वे आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिसूचनेचा भंग झाला.

पत्रकारांचा एकमुखी लढा
        या घटनेनंतर पत्रकार संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात अनुप यादव, संजय कन्नावार, राजू बिट्टूरवार, दिनेश एकोणकर, अयुब कच्ची, विर पुणेकर यांच्यासह अनेक वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी ठाणेदार योगेश हिवसे यांना तातडीने निलंबित करण्याची व चौकशीची मागणी केली.

लोकशाहीसाठी निर्णायक क्षण
        पत्रकारांवर गुन्हे दाखल होणे ही फक्त वैयक्तिक बाब नसून लोकशाही व समाजाच्या माहितीच्या हक्कावर आघात आहे. पत्रकारांचा आवाज दडपणे म्हणजेच जनतेचा आवाज दाबणे होय. म्हणूनच हे आंदोलन लोकशाही व पत्रकार स्वातंत्र्यासाठी निर्णायक ठरत आहे.

#PressFreedom #JournalistRights #StandWithMedia #SaveDemocracy #VoiceForTruth #StopSuppression #IndianDigitalMediaandBroadcastAssociation #bhumiputachikah #rajukukade #collectorofficechandrapur #PadoliPoliceStation #PI #YogeshHivse #GuardianMinisterAshokUike #MLA #kishorjoragewar #ChandrapurProtest #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top