Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शिक्षण विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविते - प्रा. गजेंद्र आसूटकर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ  डॉ. मंगेश गुलवाडे यांचीही उपस्थिती आमचा विदर्भ - अनंता गोखरे चंद्रपूर (दि.०२ जुलै २०२४) -    ...

सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ
 डॉ. मंगेश गुलवाडे यांचीही उपस्थिती
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि.०२ जुलै २०२४) -
        विद्यार्थी हा उज्ज्वल भारताचा नागरिक आहे. त्याने अभ्यासात प्राविण्य प्राप्त करून आपले नाव कमवावे. अहिल्यादेवी यांनी आपल्या काळात शिक्षणाला फार महत्व दिले होते. आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी अहिल्यादेवी यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जीवन जगावे. आपल्याला काय वाटते ते आत्मसात करावे. आपल्या शिक्षणामुळे देशाला, समाजाला काय फायदा होणार याचासुद्धा विचार विद्यार्थ्याने आपल्या जीवनात करावा. शिक्षणामुळे विद्यार्थ्याला आत्मनिर्भर बनण्यास मदत होते, असे प्रतिपादन प्रा. गजेद्र आसूटकर यांनी केले.

        पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरी समिती तर्फे सर्व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम स्थानिक जनता महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून सरदार पटेल विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या अंजली हस्तक या होत्या. तर प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथिल प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे उपप्राचार्य गजेंद्र आसूटकर होते. त्यासोबतच मंचावर समितीचे अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, समितीचे मार्गदर्शक तुषार देवपुजारी, ग्राम पंचायत सदस्या दाताळा प्रतिभा काळे, पुष्पा गुलवाडे हे मंचावर उपस्थित होते.        

        यंदाचे वर्ष हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे आहे. या पर्वाचे औचित्य साधून त्यांच्या महत्कार्याची जाणीव जागृती व्हावी यासाठी चंद्रपूर येथील त्रिशताब्दीय जयंती समारोह नागरी समितीच्या वतीने यंदा वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचा शुभारंभ येत्या 31 मे रोजी झाला असून, सर्व समाजातील विद्यार्थ्यांना अहिल्यादेवीच्या कार्याची जाणीव व्हावी या हेतूने सर्व समाजातील  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित कार्यक्रामाचे आयोजन करण्यात आले होते.

        यावेळी अंजली हस्तक यांनी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तुषार देवपुजारी यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या तसेच पुष्पा गुलवाडे यांनी विद्यार्थी जीवनात समाज कार्याची जोड कशी निर्माण करावी यांचे उदाहरण विद्यार्थ्यासमोर ठेवले. डॉ. मंगेश गुलवाडे यांनी समिती तर्फे विद्यार्थ्यासाठी घेण्यात येणाऱ्या वार्षिक कार्यक्रमाची माहिती दिली व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रातून काही प्रेरणा घेण्याचे मार्गदर्शन केले.

        कार्यक्रमात १० वी, १२ वी च्या एकूण १०० विद्यार्थ्याचा सत्कार समिती तर्फे प्रमाणपत्र, शिल्ड, पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राचे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात सुरुवातीला रत्ना साव यांनी अहिल्यादेवी गायिले. कार्यक्रमाचे संचालन खेमदेव कन्नमवार व सुनंदा कन्नमवार यांनी केले. वंदेमातरम् अदिती देव यांनी म्हटले, तर आभार प्रदर्शन महेश आस्कर यांनी केले.

#aamchavidarbha #vidarbha #news #breakingnews #chandrapur #PunyashlokAhilyaDeviHolkarJayanti #students #Education #independent #dhangarsamaj #Meritoriousstudentsfelicitated #JanataCollege #ProfGajedraAsootkar #SardarPatelLawCollege #PrincipalAnjaliHastak #drmangeshgulwade #mangeshgulwade


Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top