Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वरोरा येथे मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पोलिसांनी सापळा रचून दहा जणांना केली अटक  आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २६ एप्रिल २०२४) -         शासकीय नियमाने जिल्हा स्तरावर रेत...

पोलिसांनी सापळा रचून दहा जणांना केली अटक 
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २६ एप्रिल २०२४) -
        शासकीय नियमाने जिल्हा स्तरावर रेती घाटाचे लिलाव झाले नसतानांही वरोरा तालुक्यातून वाहणाऱ्या वर्धा नदी पात्रातील तुळाणा व करंजी घाटातून रेतीचे अवैधरित्या उत्खनन करणाऱ्या दहा जणांना पोलिसांनी आज 26 एप्रिल रोज शुक्रवारला सकाळी ताब्यात घेतले असून या आरोपी जवळून जवळपास 35 लाख 38 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

        वरोरा येथील सहाय्यक पोलीस अधिक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांना प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी वरोरा पोलिसांच्या पथकासह वर्धा नदी च्या करंजी व तुळाणा घाटावर आज 26 एप्रिल रोज शुक्रवारला सकाळी 9 वाजता छापा टाकला असता घाटावर रेती या गौण खनिजाचे अवैद्य उत्खनन करणारे ५ ट्रॅक्टर सोबत जोडलेले ट्रॉलीसह ज्यात रेती भरून असलेले आणि ट्रॅक्टर धारक व चालकांनी एकमेकांसोबत घटनेदरम्यान संपर्क साधण्याकरीता वापरलेले 3 मोबाईल फोन असा एकूण 35,38,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

        सदर रेती चोरी याप्रकरणात ट्रॅक्टर चालक आणि मालक- नितेश वामन पिंगे, मुकेश चांदेकर, विजय आनंदराव मारेकर, राजा थैम, विकास जानकीराम पंधरे, आसिफ थैम, भालचंद्र महादेव पिंपळशेंडे, राजु गंधारे, संजय मारोती खांडेकर आणि विक्की गंधारे, अशा एकूण १० आरोर्पीविरूध्द कलम ३७९,३४ भा.दं. वि. सहकलम ४८ महाराष्ट्र महसुल अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

        मिळालेल्या माहितीनुसार सदर रेती घाटात रेती उपसा करण्याकरीता शासन स्तरावरून जिल्हाधिकारी, यांचे आदेशाने लिलाव झालेले नाही. तरी सुध्दा यातील आरोपींनी संगणमताने मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून ट्रॅक्टरसोबतचे ट्रॉलीमध्ये भरतांना मिळून आलेले आहेत.

        तसेच रेती तस्करांकडुन रात्री अपरात्री रेती भरलेले ट्रॅक्टर लोकवस्तीतून भरधाव घेवून जात असल्याने नदी पात्राची व गांव रस्त्यांची दुरावस्था होत असल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत व स्वतः पुढे पाय उचलुन रेती तस्करांविरुध्द कार्यवाही करण्यास शासनाला सहकार्य करीत आहेत. अशाच प्रकारे नागरिकांचे सहकार्यातुन सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम यांनी कायदेशिर कार्यवाही केलेली आहे. पुढील कारवाई करीता सपोनि विनोद जांभळे तसेच किशोर बोढे, दिपक मोडक, विशाल राजुरकर, विठ्ठल काकडे आणि नितीन तुराळे अशा पोलीस कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केलेले आहे. रेती चोरी प्रकरणात पुढील कार्यवाही करीता अहवाल महसूल विभागाकडे पाठविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे भविष्यात रेती तरकरांकडून अवैद्यरित्या रेती उत्खनन किंवा वाहतुक केल्यास कठोर कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल, अशी चेतावणी पोलीस विभागाकडून देण्यात आली आहे. (aamcha vidarbha) (vidarbha) (warora) (chandrapur) (sand smuggling)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top