Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पगार बंदीच्या विरोधात वेकोलि कर्मचाऱ्यांचा निषेध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारा राजुरा (दि. ३ ऑक्टॉबर २०२३) -         कोल इंडियाने कोळसा कामगारांसाठी जुलै महिन्यात 11 वे वेतन मंडळ लागू केल...

आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारा
राजुरा (दि. ३ ऑक्टॉबर २०२३) -
        कोल इंडियाने कोळसा कामगारांसाठी जुलै महिन्यात 11 वे वेतन मंडळ लागू केले आणि जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन 11 व्या वेतन मंडळाप्रमाणे देण्यात आले, मात्र अधिकारी असोसिएशनच्या काही अधिकाऱ्यांनी डीपीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत वाढीव पगारावर बंदी घालण्यासाठी कटक उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसून आज दि. 3/10/2023 रोजी लाक्षणिक आंदोलन केले व तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. आज पाचही मजूर संघटनांचे शेकडो वेकोलि महाव्यवस्थापक कार्यालयासमोर जमले आणि धृतराष्ट्र अधिकारी असोसिएशनच्या काही अधिकार्‍यांच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला. 

        यावेळी भारतीय कोळसा खदान कामगार संघाचे अखिल भारतीय सरचिटणीस सुधीर घुरडे, जोगेंद्र यादव, विवेक अल्लेवार, आयटक चे वेकोली बक्षे अध्यक्ष नंदकुमार मस्के, दिलीप कनकुलवार, रामलू, एचएमएस चे रंगराव कुळसंगे, विजय कानकाटे, बबन उरकुडे आदी उपस्थित होते. मंचावर उपस्थित कोल इंडिया व्यवस्थापनाने कामगार विरोधी धोरणात बदल केले नाहीतर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला आणि 12, 13,14 ऑक्टोबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली.

        आंदोलनाच्या यशस्वितेकरिता एचएमएस चे नेते आर.आर. यादव, विजय कानकाटे, रंगराव कुलसगे आयटक दिनेश जावरे, उल्लास खुणे, सातूर तिरुपती, दिनेश पारखी, एचएमएसचे अशोक चिवंडे सुधाकर घुबडे, गणेश नाथे, बीएमएसचे गणेश पेसे, मंगेश उरकुडे, प्रदीप गावत्रे, आर.आर. यादव, विजय कानकाटे, रंगराव कुळसंगे, आयटक दिनेश जावरे, उल्लास खुने, सआतउर तिरुपती, दिनेश पारखी, एचएमएस चे अशोक चीवंडे, सुधाकर घुबडे, गणेश नाथे़, बीएमएस चे गणेश पीसे, मंगेश उरकुडे, प्रदीप गावत्रे यांनी प्रयत्न केले. (wcl ballarpur area) (rajura) (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top