Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वेकोलित कलर ब्लाइंड प्रकल्पग्रस्तांना लगतच्या क्षेत्रातच नोकरीत पोस्टिंग
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचेकडे केली होती मागणी प्रकल्पग्रस्तांनी मानले हंसराज अहिर यांचे आभार ...

प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचेकडे केली होती मागणी
प्रकल्पग्रस्तांनी मानले हंसराज अहिर यांचे आभार
किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २७ ऑक्टॉबर २०२३) -
         वेकोलित प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेत असताना वर्ष 2021 पासून नवीन SOP चे नावाखाली आवर्जून नागपूर क्षेत्रातच पोस्टिंग देण्यात येत आहे. त्यात कलर ब्लाइंड प्रकल्पग्रस्तनाचा सुद्धा समावेश आहे. कलर ब्लाइंड प्रकल्पग्रस्तांना अधिग्रहित क्षेत्राच्या लगत चे क्षेत्रातच सामावून घेण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांची होती. त्याकरिता पोवनी 3 प्रकल्पातील प्रकल्पधारक सूरज गोरे, तुळशीराम घटे यांनी हा विषय साखरी येथील सुदर्शन बोबडे, प्रशांत साळवे यांचे माध्यमातून भाजपा किसान आघाडी जिल्हाध्यक्ष राजू घरोटे (rajura gharote) यांच्या निदर्शनास आणून दिली. राजू घरोटे यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर (hansraj ahir) यांची भेट घेत सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली अहिर यांचे माध्यमातून या बाबत पत्रव्यवहार करण्यात आला.

        कलर ब्लाइंड प्रकल्प धारकांना भूमिगत खाणीत सामावून घेता येत नसल्यामुळे अश्या प्रकल्पग्रस्तांना मात्र नागपूर क्षेत्रात अनावश्यक रित्या पोस्टिंग देणे गैर आहे असे हंसराज अहिर यांनी 12 जुलाई रोजी नागपूर मुख्यालयातील बैठकीत वेकोलि मुख्यालय प्रबंधन नागपूर यांचे लक्षात आणून दिले होते. भाजपा तालुका महामंत्री अँड.इंजि. प्रशांत घरोटे, कोलगाव चे उपसरपंच पुरुषोत्तम लांडे यांनी या भूमिकेचा पाठपुरावा हंसराज अहिर यांचे माध्यमातून केला. त्यामुळे  काही प्रकल्पग्रस्तांना दिलेली नागपुर पोस्टिंग रद्द करून त्याऐवजी वणी क्षेत्रात पोस्टिंग देण्यात आली आणि इतर कलर ब्लाइंड युवकांना लगतच्या क्षेत्रातच पोस्टिंग देण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांनी हंसराज अहिर यांची भेट घेत त्यांचे आभार मानले तसेच पुष्पगुच्छ व मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. 

        वेकोलि प्रकल्पात कलर ब्लाइंड युवकांना नोकरीसाठी जेव्हा अपात्र केले जात होते तेव्हा मागील 5-6 वर्षांपूर्वी हंसराज अहिर यांच्याच माध्यमातून अश्या प्रकल्पग्रस्तनां अपात्र न समजता सर्फेस वरती नोकरीत सामावून घेण्याचे प्रावधान करण्यात आले. तसेच महिलांना सुद्धा दोन वर्षांपूर्वी इतर वेकोलि क्षेत्रात पोस्टिंग देनेची भूमिका चुकीची असून त्याऐवजी अधिग्रहित क्षेत्रातच पोस्टिंग देण्यात येण्याची भूमिका घेऊन सर्व महिला प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळउन दिला हे येथे उल्लेखनीय आहे. (rajura) (aamcha vidarbha) (wcl)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top