आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १५ ऑक्टॉबर २०२३) -
सुरज ठाकरे हे राजुरा विधानसभा क्षेत्रातील युवकांच्या गळ्यातले ताइत बनले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शासन व जनप्रतिनिधींना धारेवर धरत रस्त्यावर रोजगाराबाबतच्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम सूरज ठाकरेंच्या माध्यमातून सतत सुरू आहे.
राजुरा ते बामणी मार्गावर दरवर्षी पावसाळ्यामध्ये पडत असलेले मोठमोठे खड्डे, सुरजागड वाहतुकीमुळे रस्त्यावर पडलेली लाल माती, पेट्रोल पंपच्या विरुद्ध दिशेने असलेले अवैध पार्किंग व्यवस्था यामुळे अनेक अपघात झाले आहेत. त्यातही बऱ्याच लोकांना जबर दुखापद झाली आहे. मात्र या जनाभिमुख मागणीकरिता फक्त सूरज ठाकरे हेच सतत आवाज उचलत असताना राजुराच्या जनतेने अनेकदा अनुभवले व बघितले आहे. राजुरा-बामणी रस्त्याचे काम त्वरित सुरु करा अन्यथा आमरण उपोषणाला बसू अशी तंबी प्रशासनाला देताच अखेर प्रशासन जागे झाले व राजुरा-बामणी रस्त्याची डाकडुगी करण्याचे काम सुरु झाले आहे. जे काम निवडून आलेले जनप्रतिनिधी करू शकत नाही ते कार्य सुरज ठाकरे (Suraj Thackeray) यांच्या आमरण उपोषणाच्या तंबी ने करून दाखविले असे त्यांचे समर्थक म्हणत असले तरी मात्र या रस्त्याने जा-ये करणाऱ्या वाहनचालकांनी सुरज ठाकरे यांचे आभार मानले आहे. (rajura) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.