Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: मूर्ती ग्रीनफिल्ड विमानतळाचा फेरविचार व्हावा - अँड संजय धोटे
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राजुरा (दि. 8 ऑगस्ट 2023) -         राज...

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वनमंत्री यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. 8 ऑगस्ट 2023) -
        राजुरा तालुक्यातील ग्रिन फिल्ड विमानतळ प्रस्ताव वन सल्लागार समितीने दिनांक ०७ जुलै २०२३ च्या बैठकीत फेटाळला गेल्याची माहिती नुकतीच समोर आली असून सदर वृत्तामुळे राजुरा निर्वाचन क्षेत्रातील बामणवाडा, चुनाळा, विहिरगाव, सिंधी, नलफडी, मुर्ती, विहिरगाव, धानोरा, सुब्बई, विरुर तथा आसपासच्या तरुणांची रोजगाराची व विकासाची संधी हरवलेली आहे. या वृत्तामुळे तेथील तरुणांस असंतोष निर्माण झालेला आहे. यापूर्वी मुर्ती ग्रिन फिल्ड विमानतळाच्या भूसंपादन प्रक्रिया करिता ४६ कोटी रुपये शासनाने मंजूर करून उपरोक्त विमानतळाच्या प्रक्रियेत सुरुवात करण्यात आली होती. या संदर्भात विमान प्राधिकरणाच्या जागे संदर्भात प्रस्ताव शासनास सादर केला होते. परंतु या वृत्तामुळे तेथील लोकांच्या मनात निराशा निर्माण झालेल्या आहेत मुर्ती विहिरगाव विमानतळ झाले तर राजुरा विधानसभा क्षेत्रातील युवकांना रोजगार मिळेल. देशातील अग्रस्थानी नाव चंद्रपूर जिल्ह्याचे व राजुरा तालुक्याचे  येईल. शेतकऱ्यांना दिलासा मिळणार रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन वाहतूक व्यवस्था निर्माण होईल. प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल अशी आशा होती. (Demand through a statement to Chief Minister, Deputy Chief Minister, Forest Minister)

        विमान प्राधिकरणाने फेर प्रस्ताव सादर करण्याची मागणी या भागातील तरुण युवक तथा शेतकरी वर्ग नागरिकांची आहे. वन्यजीव किंवा वाघाचा कॉरिडॉर चा भाग मुर्ती विहिरगाव कधीही नव्हता तसेच या मुर्ती विमानतळाच्या विषयांकित भागात कान्हाळगाव अभयारण्याचा कोणताही संबंध नसल्याने प्रस्तावित कान्हाळगाव अभरण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा. जेणेकरून सदर क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल अशीही मागणी धोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. (rajura) (aamcha vidarbha)

        चंद्रपूर जिल्हात ताळोबा व्याघ्र प्रकल्प मुळे वाघाची संख्या खूप आहे. तसेच कान्हाळगाव अभरण्याचा भागचा अंतर ही जास्त असल्याने वन्य जिवाचे वनजिवन संकुलातील जैविक हस्तक्षेप होतो हे मानणे चुकीचे ठरते. वनविभागाने सदर प्रस्ताव नव्याने स्वीकारावा तसेच वाघाचा रहिवाशी करिता पुर्णता स्वतंत्र जंगल उपलब्ध असून मूर्ती, विहिरगाव हा वन्य प्राण्यांचा कॉरिडॉर नसल्याने या भागातील विकासाला चालना मिळणार नाही. अनेक तरुणांना रोजगाराची संधी मिळणार नाही. त्यामुळे वन सल्लागार समिती कडे विमान प्राधिकरणाच्या माध्यमातून नव्याने प्रस्ताव पाठवून विमानतळाच्या प्रश्नावर फेरविचार व्हावा अशी मागणी माजी आमदार अँड संजय धोटे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वनमंत्री याना केलेली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top