Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: वेकोलिच्या कोळसा खाणीवर चोरांची वक्रदृष्टी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सास्ती कोळसा खाणीत रशियन बनावटीच्या ड्रगलाइन मशीनवर धाडसी चोरी चाकूचा धाक दाखवून लाखोंचा तांबा तार चोरला आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे राज...
सास्ती कोळसा खाणीत रशियन बनावटीच्या ड्रगलाइन मशीनवर धाडसी चोरी
चाकूचा धाक दाखवून लाखोंचा तांबा तार चोरला
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
राजुरा (दि. २६ ऑगस्ट २०२३) -
        वेकोलीच्या बल्लारपूर क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या सास्ती खुल्या कोळसा खाणीत पहाटेला काळ्या पोशाखात आलेल्या दहा ते बारा जणांच्या टोळीने रशियन बनावटीच्या ड्रगलाइन मशीनला घेरून व कार्यरत असणाऱ्या कामगारांना चाकूचा धाक दाखवीत ट्रासफार्मर मधील तांब्याचे कॉइल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. (A daring heist on a Russian-made dragline machine at the Sasti coal mine)

        ड्रगलाईन मशीन मध्ये पाच पेक्षा जास्त ट्रान्सफार्मर असल्याचे सांगण्यात येत आहे. या ट्रान्सफार्मर मधील तांब्याची किंमत लाखोंच्या घरात असते. मागील काहीवर्षापासून सदर ड्रगलाईन मशीन हि कार्यरत नसून या मशीनवर कार्य करणाऱ्या कामगारांना मात्र लाखोंच्या घरात पगार मिळत आहे हे विशेष. या घटनेने कामगारात दहशतीचे वातावरण पसरले आहे. (He stole lakhs of copper wire at knifepoint) (WCL Ballarpur area)

        वेकोलीच्या बहुतेक कोळसा खाणी सध्या चोरांच्या रडारवर असून या खाणीतून कोळसा, डिझल, बॅटरी, स्क्रॅप मटेरियल, महागड्या गाड्यांचे सुटेभाग, केबल आदी किंमती साहित्य चोरीला जात आहे. खाणीत वेकोलीची सुरक्षा व्यवस्था असूनही चोरांचे हे धाडस पाहून सारेच अचंभित होत आहे. दरम्यान रशियन बनावटीच्या या मशीनवर तीन कामगार रात्रौ पाळीत कामाला होते. अचानक पहाटेच्या सुमारास दहा ते बारा जणांच्या टोळक्याने मशीनला घेरले व लॉकर तोडले कामगारांचे मोबाईल हिसकावले. त्यानंतर टूल्स मधील पाने काढून सहा ट्रासफार्मर चे तांब्याचे कॉइल चोरून नेले. सर्व चोरटे काळे कपडे व काळे दुप्पटे लावून असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. (sasti opencast mine project)

        या घटनेमुळे मशनरी सोबतच कामगारांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. खाणीत  धाडसी चोरी होऊनही वेकोली प्रशासन गंभीर दिसत नसल्याने चोरीचे प्रमाण दिवसागणिक वाढत असल्याचे कामगारामध्ये बोलल्या जात आहे. कोळसाखाणी लगत पोलीस स्टेशन ची एकमेव पोलीस चौकी आहे. पण सध्या चौकीच रामभरोसे असल्याने वेळेवर कोणीच मिळत नसल्याचा आरोप होत आहे. याबाबत वेकोलि प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केल्याचे समजते. (rajura)       
वेकोलिच्या कोळसा खान क्षेत्रात दिवसागणिक चोरीच्या घटना घडत आहे. या प्रकरणी पोलीस थातुरमातुर चौकशी करून चोरट्यांना जेरबंद करीत आहे मात्र या चोरीच्या मागच्या म्होरक्याना पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही. त्यामुळे तपासावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. पोलीस व वेकोलि प्रशासनाच्या चालढकल व बेजबाबदारपणामुळे राष्ट्रीय संपत्ती असलेल्या वेकोलिला मात्र कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक फटका बसत आहे.

दि. २५ ऑगस्ट ला घुगुस येथील विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीत माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी वेकोलि परिसरात वाढत असलेली चोरी आणि वाढती गुन्हेगारी यावर वेकोलिने त्वरित आळा घालण्याची सूचना दिली. बैठकीत उपस्थित वेकोलिचे सीएमडी, पाचही वेकोलि क्षेत्राचे महाव्यवस्थापक यांना दिल्या. (aamcha vidarbha)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top