राजुरा (दि. २ जून २०२३) -
दिनांक २ जून २०२३ रोजी इयत्ता दहावी स्टेट बोर्डाच्या जाहीर झालेल्या निकालात इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराच्या विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करीत बाजी मारली. (Infant Jesus English High School Rajura)
यात सुरज बंडू रागीट ने ९३.८०% गुण घेऊन इन्फट कान्वेंट मधून प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. काजल रामा चन्ने ने ९०.८०% गुण मिळवून द्वितीय तर कु. काया संतोष चौधरी ने ८९.४०% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला आहे. तृणाल भाविदास बुटले ८९.२०%, व कु. श्रुती दिनेश पारखी ने ८८.४०% गुण घेऊन अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकाविला. शैक्षणिक सत्र सन २०२२-२०२३ या वर्षी इयत्ता दहावी स्टेटच्या परिक्षेसाठी एकूण ६१ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यातून २ विद्यार्थी मेरीटमध्ये, ३७ विद्यार्थी डिस्टींक्शन मध्ये, १८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर ३ विद्यार्थी द्वितीय क्षेणीत उत्तीर्ण झाले. (subhash Dhote)
विद्यार्थ्यांच्या या कामगिरी व यशाबद्दल विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वृंदांचे आमदार तथा इन्फट जिसस सोसायटीचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव तथा नगराध्यक्ष अरुण धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, सीबीएसई शाखेच्या मुख्याध्यापक रफिक अन्सारी, यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. (rajura) (aamcha vidarbha)
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.