Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जुगार अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
११ जुगारी पोलिसांच्या ताब्यात साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी चंद्रपुर -         स्थानिक गुन्हे शाखेच्या पथका...
११ जुगारी पोलिसांच्या ताब्यात
साडेसात लाखाचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - कार्यालय प्रतिनिधी
चंद्रपुर -
        स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, राजुरा येथील गोलू उर्फ ईश्वर ठाकरे हा इसम इंदिरानगर जवळील जोगापुर जंगल शिवारात जुगाराचा अड्डा भरवुन जुगार अड्डा चालवित आहे. अशा माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सदर ठिकाणी छापा कारवाई करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेतील अधिका-यांच्या नेतृत्वात तिन पथके तयार केली. त्यावरून सदर पथकांनी दिनांक १५/११/२०२२ वे पहाटे ०२.१५ वाजता जोगापूर जंगल शिवारात चालु असलेल्या जुगार अड्यावर छापा टाकुण एकुण ११ जुगा-यांना ताब्यात घेवुन त्यांचे जवळुन नगदी ३,९२,११०/- रू ४२,०००/- रू किंमतीचे एकुण पाच मोबाईल हॅन्डसेट, ३,२५,०००/- रू किंमतीच्या सहा मोटार सायकली व इतर जुगाराचे साहीत्य असा एकुण ७,५९,११०/- रू. चा मुद्देमाल जप्त केला व आरोपीत इसम नामे ०१ ) हाफीज रहमान खलील रहमान, वय ५३ वर्षे रा. गुरू नगर, विरान टॉकीज रोड, वणी जि. यवतमाळ, ०२ ) अनिल तुळशिराम खोब्रागडे, वय ५४ वर्षे रा. बाबुपेठ वार्ड क्र. ०३ चंद्रपूर, ०३) सैफुद्दीन उर्फ सैफु नन्ने शहा, वय ५५ वर्षे रा. रामपूर भवानी मंदिराजवळ, राजुरा, ०४) दिपक गणपत पडोळे, वय ३८ वर्षे, रा. अंचलेश्वर वार्ड, चंद्रपूर, ०५) राकेश गणपत पडोळे, वय ५० वर्षे रा. अंचलेश्वर वार्ड चंद्रपूर, ०६) मनोज उध्दव कायडींगे, वय ४२ वर्षे रा. बाबापूर सास्ती, राजुरा, ०७) गणेश रामदास सातफाडे, वय ३५ वर्षे रा. वार्ड नं. ०४, गडचांदूर, ०८) प्रदिप दिपक गंगमवार, वय ४९ वर्षे, रा. महाकाली वार्ड चंद्रपूर, ०९) बाल्या उर्फ आनंद किसन बट्टे, वय ३४ वर्षे, रा. इंदिरानगर वार्ड, राजुरा, १०) शंकर विश्वनाथ पटेकर, वय ५६ वर्षे रा. हनुमान मंदिराजवळ सास्ती राजुरा व ११) इजाज खान अजीम खान, वय ४१ वर्षे, रा. मदीना मस्जीद जवळ, तुकुम चंद्रपूर व जुगार भरविणारा इसम नामे १२) गोलू उर्फ ईश्वर सुधाकर ठाकरे, वय अ. २९ वर्षे रा. पेठवार्ड, आंबेडकर चौक राजुरा यांचे विरूध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंद करून नमुद आरोपीतांना पुढील कार्यवाही कामी पोस्टे राजुरा यांचे ताब्यात दिले.

        सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती रिना जनबंधु, पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि मंगेश भोयर, सपोनि संदिप कापडे, पोलीस अंमलदार स्वामीदास चालेकर, सुरेंद्र महतो, चंदु नागरे, अजय बागेसर, गणेश मोहुर्ले, प्रशांत नागोसे, गणेश भोयर, प्रदिप मडावी, गोपीनाथ नरोटे, विनोद जाधव, चालक प्रमोद डंभारे, दिनेश अराडे यांनी केली.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top