नितीन बावणे यांनी दिल्या सर्वाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, व्यावसायिक असे कोणतेही क्षेत्र असो, कोरपन्यातील युवा पिढी प्रत्येक क्षेत्रात आपले नाव लौकिक करीत आहे. या युवकांना मदतीचा व मार्गदर्शनाचा हात समोर केला आहे युवा प्रतिष्ठान कोरपना ने, नुकत्याच झालेल्या नॅशनल एंट्रन्स एलिजीबिलिटी टेस्ट (NEET) या वैद्यकीय शाखा प्रवेश परीक्षेत कोरपना येथील वैष्णव नानाजी ढवस, अंजली वानखेडे व पल्लवी पेशाल या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केल्याबद्दल युवा प्रतिष्ठान कोरपना तर्फे शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कौसेन सैय्यद आरिफ अली यांना B.Planning या Entrance Exam madhe 90% मिळाल्याबद्दल यांचा ही शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी युवा प्रतिष्ठान चे सर्व सदस्य व अध्यक्ष नितीन बावणे यांनी सर्वाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देतांना अध्यक्ष नितीन बावणे नगरपंचायत चे उपाध्यक्ष इस्माईल, नगरसेवक मोहम्मद, नगरसेवक निसार, लाल मादेवार, गंगाधर बुरेवार, मोबिन, श्रीकांत लोडे, सुरज खोबरकर, आशिष मेश्राम, घिरज चन्ने, पियुष कावरे, प्रणय बावने, नवाजीश, अमोल लोडे, तुषार भोयर, दिलीप जाधव, प्रतीक डोंगे, विशाल भोयर, संकेत राऊत, नईम शेख, समिर आमने, शुभम गोचे, क्रिष्णा बोढे, राहुल जाधव, हर्ष डोंगे, विनीत गंगशेट्टीवार, ओमकार मुके, रोशन बोबडे, रितिक मडावी, मयुर सोनटक्के, नावेद पठान, अभिषेक ईटनकर, आकाश पारखी व युवा प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.