Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्त्यावर बसलेल्या 5 गाई वासरांना चिरडले
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
2 गाई मृत, 3 गंभीर जखमी नांदा फाटा येथे वाहतूक पोलीस नियुक्त करून चौकातील अतिक्रमण हटविण्याची मागणी धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्...
2 गाई मृत, 3 गंभीर जखमी
नांदा फाटा येथे वाहतूक पोलीस नियुक्त करून चौकातील अतिक्रमण हटविण्याची मागणी
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी 
गडचांदुर -
नांदा फाटा येथील चौकाजवळ आज पहाटे 6 वाजताच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्त्यावर बसलेल्या 5 गाई वासरांवर चिरडल्याने दोन  गाई जागेवरच मरण पावल्या आणि 3 वासरे गंभीर रित्या जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार आज पहाटे भरधाव वेगात गडचांदूरच्या दिशेने जात असलेल्या ट्रक क्र. MH40 CD6791 ने रोडवर बसलेल्या पाच गाईवर वाहन चढवले. चौका जवळ उपस्थित अनेक लोकांनी गाडी कडे धाव घेतली व ड्रायव्हरला पकडुन पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ड्रायव्हर रियाज अरशद अली वय 25 ला ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळी उपस्थित लोकांच्या सहाय्याने ट्रकच्या खाली अडकलेल्या मृत व गंभीर रित्या जखमी गाईंना बाहेर काढून ट्रकला गडचांदुर पोलीस स्टेशन ला लावले. घटनेची माहिती होतास मोठ्या संख्ये त लोकांची गर्दी झाली होती परंतु पोलिसांनी वेळेवर घटनास्थळी पोहोचून स्थिती नियंत्रणात केली नांदा पोलीस ने मृत आणि गंभीर जखमी झालेल्या जनावरांना रोडवरील वरून हटवून मार्ग मोकळा केला. वाहन नागपूर येथील संजय जैन यांच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली आहे. वाहन चालकांवर गुन्हा दाखल करून घटनेचा पुढील तपास गडचांदुर पोलिस करीत आहे.

नांदा फाटा चौक हे वर्दळीचे ठिकाण असून येथे नेहमी वाहनांची ये जा असते. येथील मुख्य चौकातील रस्त्यावर भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांनी रोडपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून घेतले आहे. सडलेले व शिल्लक भाजीपाला खाण्याकरिता मिळत असल्याने मोठ्या संख्येत मोकाट जनावर रस्त्यावरच बसून असतात. अनेक वेळा स्थानीय नेते, ग्रामपंचायत अधिकारी आणि पोलिस प्रशासनाला यावर मोकाट जनावर आणि उपाय करण्याची मागणी करण्यात आली होती. चौकात सतत वाढत असलेल्या अतिक्रमणामुळे अनेक वेळा मोठा अपघात होण्याची भीती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व्यक्त करण्यात आली होती. परंतु गाड झोपेत असलेल्या ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाने जनतेच्या मागणी कडे कानाडोळा केला.  नांदाफाटा येथील चौकात वाहतूक पोलीस नियुक्त करण्याची अनेक वेळा मागणी करत पोलिसांना निवेदन देऊन वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करण्यात आले. आता उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर  झालेल्या या घटनेनंतर तरी नांदा फाटा येथे वाहतूक पोलीस नियुक्त करून रस्त्यावर फिणाऱ्या मोकाट जनावरे आणि चौकात अतिक्रमण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतील अशी अपेक्षा येथील स्थानीय नागरिक करीत आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top