Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: गांधी चौकात दहीहंडी उत्सव साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
गांधी चौकात दहीहंडी उत्सव साजरा गोविंदाचा वेशात सजले बालगोपाल सचिनसिंह बैस व राधेश्याम अडानिया यांचा पुढाका र बघा व्हिडीओ आमचा विदर्भ - न्यू...
गांधी चौकात दहीहंडी उत्सव साजरा
गोविंदाचा वेशात सजले बालगोपाल
सचिनसिंह बैस व राधेश्याम अडानिया यांचा पुढाका
बघा व्हिडीओ
आमचा विदर्भ - न्यूज नेटवर्क
राजुरा -
स्थानिक गांधी चौकात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व सण उत्सवावर बंदी असल्यामुळे या वर्षी शासनाने सर्व सण उत्सवावरील बंदी उठविली. त्यामुळे ठिकठिकाणी जन्माष्टमी आणि भगवान श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालगोपाल, सवंगडी, मित्रतेची दहीहंडी अश्या अनेक गुणांची महती होऊन आनंदाने जीवन जगण्याची संकल्पना घेऊन हा उपक्रम घेण्यात आला. दहीहंडी उत्सवाकरिता स्वराज्य फाऊंडेशनचा ७५ वादकांचे ढोल ताशांचे विशेष नगाडा पथक बोलाविण्यात आले होते. या पथकाने विविध ध्वनिलहरींचे वादन सुरु केले आणि आणि जल्लोष करीत उपस्थित नागरिकांमध्ये नवचैत्यन्य निर्माण केले. गोविदांनी जोरदार गर्जना करीत ढोल ताशांचा गजरात मानवी मनोरा तयार करीत दहीहंडी फोडली. स्थानिक गांधी चौकात मागील २० वर्षांपासून हा उत्सव येथे अविरत सुरु आहे हे विशेष. 

यावेळी माजी आमदार अँड. संजय धोटे, भाजपचे जेष्ठ नेते सतीश धोटे, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, विलासराव बोनगीरवार, भास्कर येसेकर, विनायक देशमुख, सचिन शेंडे, सचिन डोहे, गणेश रेकलवार, सुरेश रागीट, अनिल खनके, पराग दातारकर व गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. दहीहंडी निमित्य साहिल सोळंके, कपिल बोपनवार, विजय मिलमिले व मित्र परिवाराकडून मसाला भात चे वितरण करण्यात आले. वंचित बहुजन आघाडी जिलाध्यक्ष भूषण फुसे यांच्याकडून वाद्यपथकातील मंडळीला शीतपेयाच्या वाटप करण्यात आले. दहीहंडी उत्सवाच्या यशस्वितेकरिता मुख्य आयोजक सचिनसिंह बैस व माजी नगर सेवक राधेश्याम अडानिया यांनी पुढाकार घेत योग्य नियोजन केले त्यांना आकाश सिंह, मुन्ना तिवारी, गोविंदा लिपटे, प्रतिकसिंह बैस, अल्विन, ऑस्टिन, मंगेश कोंडेकर, विशाल सिंह, सुराजसिंह बैस, विशालसिंह बैस, असलम चाऊस, सकलेन बेग, विशाल वांढरे, मंगेश गंपावार, अनिल पुरटकर व मित्रमंडळाचे साथ लाभली. स्थानिक पोलिसांनी चोख बंदोबस्त राखला. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top