कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांची आर्त हाक
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
कोरपना -
कृषी क्षेत्राचा शाश्वत विकास करण्यासाठी शासनाने गेल्या तीन वर्षांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी केली. कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन, शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येते. राज्यभर सूक्ष्म सिंचनाचे जाळे निर्माण केले जात. यासर्व बाबींचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. कृषी विकासाच्या योजनांना गती देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. गेली सलग चार वर्षे राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने त्याचा परिणाम एकंदरीतच कृषी विकासावर आणि शेतकरी बांधवांवर झाला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे होरपळलेल्या बळीराजाला सावरण्यासाठी गेल्या तीन वर्षात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येत आहे पण कोरपणा येथील महावितरण चे अधिकरी शेतकऱ्यांना शेतातील कृषी पम्पाला विज जोडणी देण्यासाठी असमर्थता दाखवत आहे गेल्या वर्षभरापासून अनेक शेतकऱ्यांनी कृषी पंपाच्या विज जोडणीसाठी अर्ज केला आहे पण न ना शेतकऱ्यांना विज जोडणी करून मिळाली ना त्यांना डिमांड मिळाले.
सततच्या होणाऱ्या पावसामुळे खरीप हंगामातील पिक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तर रब्बी हंगामातील पिक घेण्यासाठी शेतातील बोरवेल ला विज जोडणी नाही अशा द्विधा अडचणीत शेतकरी सापडलेला आहे. या समस्येची दखल घेउन संबंधित विभागाने शेतकऱ्यांचे डिमांड काढून विज जोडणी करून द्यावी व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
मी मागील वर्षी विज जोडणी डिमांड साठी अर्ज केला पण वर्ष लोटले तरी मला डिमांड वा विज जोडणी करून मिळाली नाही. अधिकाऱ्यांना विचारले असता उडवा उडवी चे उत्तरे देऊन वेळ काढून नेत आहे, नाईलाजास्तव मी उप अभियन्ता गडचांदुर महवितरण यांना सरळ विज जोडणी करीत असल्याबाबत अर्ज केला.रितेश आस्वले, शेतकरी, वनसडी
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.