- महात्मा बसवेश्वर हे ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष - आ. किशोर जोरगेवार
- लिंगायत समाजाच्या वतीने आमदार जोरगेवार यांचा सत्कार
- महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोणत्याही प्रकारचे शारीरिक श्रम हे हीन दर्जाचे नाहीत, असे सांगून जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांनी श्रमप्रतिष्ठा वाढवली. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्मय, राजकारण अशा क्षेत्रात त्यांचे कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे. ते भारताच्या धार्मिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, राजकीय व सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष होत असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
लिंगायत समाजाच्या वतीने जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमीत्त जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मा.सा. कन्नमवार सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी लिंगायत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रमेश मुलकलवार, राजूरा सार्वजनिक बांधकाम उप विभाागचे सहाय्यक अभियंता आकाश बाजारे, बल्लारपूरचे नगरसेवक अरुण वाघमारे, जिवतीच्या माजी नगराध्यक्ष पुष्पा सोयाम, जिवतीच्या बांधकाम सभापती उर्मिला बेल्लाले आदिंची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, लिंगायत समाज आज सर्व क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करत आहे. हा समाज सेवाकरी असून महात्मा बसवेश्वर यांच्या उपदेशा नुसार सेवा करण्याचे काम करीत आहे. या समाजातील समस्या सोडवण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहे. समाजाच्या स्मशानभुमीच्या सुरक्षा भिंतीसाठी आपण 15 लक्ष रुपयांचा निधी दिला असून लवकरच हे काम पुर्ण होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.