- विज बिल खंडीत असलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करु नका, यंग चांदा ब्रिगेडची मागणी
- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना निवेदन
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
कोरोनाचा प्रादुर्भाव, अनियमित वातावरण यामूळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ही बाब लक्षात घेता विज बिल खंडीत असलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये तसेच खंडीत करण्यात आलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा पूर्ववत सुरु करण्यात यावा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या ग्रामीण विभागाच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे तालुका प्रमुख राकेश पिंपळकर, गणपत कुळे, चंदु माथने, नंदकिशोर वासाडे, भारत बल्की, भास्कर अडबाले, महादेव माकोडे, गोरे, किसन काटवले आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी मागील अनेक महिन्यांपासून आर्थिक विवंचनेत आहे. अवकाळी पाऊस आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. कोरोना महामारीकाळातील परिस्थितीमुळे शेतकरी वर्ग पूर्णतः संकटात सापडलेला आहे. शेतीशिवाय दुसरे कुठलेही आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत नसल्याने कुटुंबाचा उदर निर्वाह चालवणे हा गहन प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे. अश्या परिस्थितीत थकीत वीज बिलामुळे शेतकर्यांचे घरगुती वीज व शेती वीज कनेक्शन कापल्या जात आहे. सद्यस्थिती हि शेतीला अनुकूल असुन शेतीसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जर एन हंगामाच्या काळात पाणी पुरवठा न झाल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून शेतकरीवर्ग कर्जाच्या खाईत लोटला जाईल. त्यामुळे या विषयाच्या गंभीरतेने दखल घेत सहानुभूतीपूर्वक विचार करून सद्यस्थितीत शेतकरी वर्गाची वीज कनेक्शन कापणे थांबवावे व ज्या शेतकऱ्यांचा विद्युत
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.