Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पिशव्यांची विल्हेवाट लावण्याची गरज मुक्या जनावरांना प्लास्टिकमुळे धोका
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पिशव्यांची विल्हेवाट लावण्याची गरज मुक्या जनावरांना प्लास्टिकमुळे धोका शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - प्लास्टिक पिशव्यांच्या व...

  • पिशव्यांची विल्हेवाट लावण्याची गरज
  • मुक्या जनावरांना प्लास्टिकमुळे धोका
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे निर्माण होणारी समस्या ही मुख्यत्वे कचरा व्यवस्थापनात येणाऱ्या अडचणींमुळे निर्माण होते. प्लास्टिकमधील विघटन न होणाऱ्या रसायनांमुळे पर्यावरणाला मुख्य धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे याचा धोका मुक्या जनावरांना मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे पिशव्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्याची गरज आहे. शहरात प्लास्टिक बंदी असली तरी येथील दुकानदार मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्याचा वापर करतांना दिसून येत आहे. बाजारात असो की व्यावसायिक कपड्याच्या दुकानात येथे सर्रासपणे प्लास्टिक पिशव्याचा वापर करण्यात येत आहे. नागरिक ही या प्लास्टिक पिशव्याचा वापर झाला की ते कचऱ्यात टाकून देत आहे. मात्र हाच कचरा मके प्राणी खात असल्याने त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. काही दिवसांपूर्वीच एका गायीचा मृत्यू याच कारणाने झाला होता. त्यामुळे प्लास्टिक पिशव्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही तन याचा धोका प्राण्यांना होणा असून यात शहरातील मोका मुक्या गायींना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशव्यांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावणे गरजेचे झाले आहे. 

सांडपाण्याच्या मार्गात अडचण
या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे सांडपाण्याच्या मार्गात अडचण निर्माण होते. ते नालीत अडकून पाणी निचरा करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात. त्यामुळे परिसर अस्वच्छ होतो आणि पाण्यातून पसरणारे आजार वाढतात. रिसायकल केलेल्या किंवा रंगीत प्लास्टिक पिशव्यांमध्ये काही रसायने असतात, जी जमिनीमध्ये झिरपतात आणि माती व जमिनीतील पाणी दूषित करतात. ज्या युनिट्समध्ये रिसायकलिंगची पर्यावरणस्नेही यंत्रणा नसेल तेथे देखील या प्रक्रिये दरम्यान तयार होणाऱ्या विषारी धुरामुळे पर्यावरणीय समस्या उभी रहाते.

गायींना अधिक धोका
ज्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये अन्न असते, अशा पिशव्या कचऱ्यात टाकल्यास अनेक प्राणी त्यातील अन् खाण्याच्या नादात पिशव्या देखील खातात. त्यामुळे एक वेगळीच समस्या उभी रहाते. प्लास्टिकचे जैविक पध्दतीने विघटन मिळण्यास अडथळा निर्माण होतो. तसेच प्लास्टिकची गुणवत्ता वाढविण्यासाठी आणि गुणवत्ता विघटनास मदत व्हावी यासाठी प्लास्टिसायझर फ्लेम रिटाईण्ट्स असे घटक बन्याचदा वापरले जातात. ज्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो. सोबत गायींना हे प्लास्टिक खाल्यास त्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top