- अठ्ठावीस वर्षानंतर रामपुरातील दोन एकर जमिनीवर मिळाला ताबा
- जिल्हा सत्र न्यायालयाचा २८ वर्षांनंतर निकाल
- कोट्यवधींची मालमत्ता वारसदारांना मिळाली
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
राजुरा -
शहराच्या सीमेलगत असलेल्या रामपूर येथील वैरागडे कुटुंबात आपसी वाद होता. या वादात एका शेत जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. दरम्यान, तब्बल २८ वर्षानंतर जिल्हा सत्र न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला असून संबंधित वैरागडे यांच्या वारसदारांनी २ एकर जागेचा सोमवारी ताबा घेतला आहे. या निकालामुळे परस्पर शेतजमिनीचे तुकडे करून विकणाऱ्या कथित महाभागांना चांगलीच चपराक बसली आहे.
राजुरा शहरातील नाका नंबर ३ लगतच्या व भवानी मंदिराच्या समोरील गडचांदूर रोडला लागून असलेल्या सर्वे क्रमांक ३०/२ मधील दोन एकर शेतजमिनीचा वाद सुरू होता. यामध्ये मय्यत भगिरथाबाई भगवान वैरागडे यांचे वारसदार विजय भगवान वैरागडे, सुनंदा प्रकाश कुंभलकर, सुनीता पुरुषोत्तम खोब्रागडे व मय्यत लक्ष्मण भगवान वैरागडे यांचे वारसदार सुरेखा लक्ष्मण वैरागडे व मदन लक्ष्मण वैरागडे यांनी बाळकृष्ण भगवान वैरागडे व इतरांच्या विरोधात जिल्हा सत्र न्यायालयात दिवाणी दावा १९९३-९४ मध्ये दाखल केला होता. बाळकृष्ण वैरागडे यांनी काही लोकांना करारनामा करून
दिल्याची चर्चा आहे. सद्यस्थितीत त्याठिकाणी अठरा निवासी व वाणिज्य वापरात असलेल्या इमारती दिसून येत आहे. न्यायालयाने मय्यत भगिरथाबाई व लक्ष्मण वैरागडे यांच्या पाच वारसदारांच्या बाजूने निकाल देत तत्काळ त्या दोन एकर जागेवर कब्जा करण्यासाठी आदेश पारित केला व न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या देखरेखेखाली व पोलीस बंदोबस्तात सोमवारी सकाळपासून त्या जागेची मोजणी सुरू होती. सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास पाच वारसदारांना जागेचा कब्जा देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.