शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
नववर्षाची सुरवात आमदार किशोर जोरगेवार यांनी सिएसटीपीएस येथील वीज कामगारांसोबत केली. यासाठी आ. जोरगेवार यांनी आज सकाळी सिएसटीपीएस येथे प्रत्येक्ष जावून कामगारांच्या अडचणी समजून घेत त्यांच्या परिश्रमाचे कौतूक करत त्यांना नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे युवा शहर संघटक कलाकार मल्लारप, यंग चांदा ब्रिगेडच्या वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष हेरमन जोसेफ, यंग चांदा ब्रिगेडच्या वीज कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रकाश पडाल, शहर संघटक पंकज गुप्ता, युवा नेते अमोल शेंडे, जितेश कुळमेथे, राशेद हुसेन, विलास वनकर, विश्वजित शाहा, बबलू मेश्राम, नितीन शाहा, मंगेश अहिरकर, गौरव जोरगेवार, शकिल शेख आदिंची उपस्थिती होती.
दरवर्षी प्रमाणे यंदाही आमदार किशोर जोरगेवार यांनी नव वर्षाची सुरवात कामगारांसोबत केली. सिएसटीपीएस येथील कामगार महाराष्ट्र प्रकाशमय ठेवण्याचे काम करत आहे. येथील कामागरांच्या श्रमावरच सर्वाधीक विद्युत निर्माता करणारा जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हाची ओळख निर्माण झाली असून ती कायम राहिली आहे. अशा कामगारांसोबत नव वर्षाची सुरवात करतांना आनंद होत असल्याचे यावेळी ते म्हणाले, नव वर्षाचा पहिला दिवस हा कामगारासोबत साजरा करत असतांना येथील कामगारांच्या अडचणींचीही जाण असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले, औष्णिक विद्युत निर्मीती प्रकल्पात काम करत असतांना कामगारांना येणा-या अडचणी बाबतही त्यांनी या प्रसंगी माहिती जाणून घेतली. येथे काम करणा-या कामगार वर्गाला सन्मानजनक वागणूक दिल्या गेली पाहिजे, पूर्ण सुरक्षा साधने उपलब्ध करुन दिल्या गेली पाहिजे अशा सुचनाही यावेळी उपस्थित अधिका-र्यांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.