Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रस्त्यावरील खड्ड्याने पुन्हा एका युवकाचा घेतला जीव
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी गडचांदूर - राजुरा-रामपूर-कवठाळा मार्गावरील वरोडा गावांसमोर खड्ड्यांमध्ये मोटर सायकल उसळून एक महिला ...

















































धनराजसिंह शेखावत - आमचा विदर्भ प्रतिनिधी
गडचांदूर -
राजुरा-रामपूर-कवठाळा मार्गावरील वरोडा गावांसमोर खड्ड्यांमध्ये मोटर सायकल उसळून एक महिला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना ताजी असतांनाच, कोरपना तालुक्यातील माथा येथे नातेवाईकांना भेटून दुचाकीने जात असताना आसन गावा जवळ रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने एका तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी अंदाजे 5.30 च्या सुमारास घडली. महेश नवनाथ बोबडे वय वर्ष अंदाजे 21 रा.अहेरी तालुका राजूरा असे मृतकाचे नाव असून खड्ड्यात दुचाकी पडल्याने त्याच्या डोक्याला जबर मार बसला. अती रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती असून घटनेची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी हितेंद्र रायपूरे, पोहवा धर्मेंद्र रामटेके, पोना धर्मराज मुंडे यांनी घटना स्थळी गाठून त्याला ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 
रस्यावर पडलेले मोठमोठे खड्डे नागरिकांना जीवघेणे ठरत असून बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने निष्पापांचे नाहक बळी जात असल्याची जळजळीत भावना व्यक्त होत असून यमस्वरूपी रस्त्यावरील खड्डे अजून किती जीव घेणार असे नागरिकांत बोलले जात आहे. संबंधित विभागाने तात्काळ रस्त्यावरील खड्डे बुझविण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top