Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: राष्ट्रीय महामार्गाच्या कामासोबत जुन्या रस्ताचे चौपदरीकरण डिव्हायडर विद्युतीकरणसह सुशोभिकरण करा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
माजी आमदार निमकर यांची मागणी; सुधीर मुनगंटीवारांना निवेदन आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स  राजुरा - राष्ट्रीय महामार्ग 353 - B या महामार्गावर...




























  • माजी आमदार निमकर यांची मागणी; सुधीर मुनगंटीवारांना निवेदन
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स 
राजुरा -
राष्ट्रीय महामार्ग 353 - B या महामार्गावर बांधकाम करताना राजुरा शहरातून जाणाऱ्या आत्ताच्या रस्त्याचे चौपदरीकरण, रस्तादुभाज, विद्युतीकरणासह सुशोभीकरण करण्यात यावे. याचबरोबर राजुरा शहराबाहेरून जाणाऱ्या बायपास राष्ट्रीय महामार्गावरील दोन किमी अंतरावर पुलाचे बांधकाम करावे व राजुरा-गडचांदूर मार्गावरील राजुरा रेल्वे पुलियाखालून जाणाऱ्या रस्त्यावर पुलिया तयार करण्याची मागणी माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी निवेदनाद्वारे विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा आमदार सुधीर मुनगंटीवार व प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडे केली आहे.
चंद्रपूर - बल्लारशा - बामणी - राजुरा - लक्कडकोट ते राज्यसिमा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 - D व राजुरा - कोरपना राज्यसिमा ते आदिलाबाद या राष्ट्रीय महामार्ग क्र. 235 - B या दोन्ही महामार्गाचे काम सुरू होणार आहे. या दोन्ही महामार्गाांकरीता राजुरा लगत बायपास रस्त्याचे काम होणार आहे. मात्र या अगोदर अस्तित्वात असलेला राजुरा शहरातून जाणाऱ्या या दोन्ही स्त्याचे बांधकाम जुना जेवढा रोड आहे तेवढेच डांबरी नुतनिकरण करणार आहे. परंतु अस्तित्वात असलेल्या या रस्त्यांची रूंदी चौपदरीकरण करण्याइतकी बांधकाम विभागाची रस्ता हद्द आहे. अस्तित्वात असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिज पासून जोगापूर गेट पर्यत व पंचायत समिती चौक ते गडचांदूर रोडवरील रेल्वे पुलापर्यंत अशा या दोन्ही रस्त्याचे चौपदरीकरण करूण मधात रस्तादुभाजक व विद्युतीकरणासह सुशाभिकरण करणे आवश्यक आहे. रस्ता चौपदरीकरण करण्यासाठी भुअजन करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. हा शहरातील मुख्य मार्ग असून रहदारीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. 
तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 - B राजुरा - कोरपना - राज्यसिमा ते आदिलाबाद या मार्गावरील राजुरा शहरा नंतर रामपूर गावाजवळ असलेल्या रेल्वे पुलाच्या अगोदर रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे. या रस्त्याच्या पश्चिम दिशेकडून येणारे पावसाचे पाणी पुलीया नसल्यामुळे सरळ निघून जाण्यास अडथडा निर्माण होत आहे वाहून येणारे सर्व पाणी साचून रामपूर गावात कृत्रीम पूर परिस्थिती निर्माण होत असते. येथील वस्तीतील काही घरासह शाळा, महाविद्यालय इमारतीत 5 फुट पाणी साचल्या जाते. जर रेल्वे पुलाच्या अलिकडून या रोडला पुलाचे बांधकाम केल्यास हे सर्व पाणी लगत असलेल्या भवानी नाल्यात सरळ निघून जाऊन कृत्रिम पुरस्थिती निर्माण होणार नाही. याकरिता याठिकाणी पुलाचे बांधकाम करणे अत्यंत आवश्यक आहे. बामणी-राजुरा महामार्गावरील वर्धा नदीवरील मोठ्या पुलाचे बांधकाम इरई नदीवरील बांधलेल्या पुलाप्रमाणे सुशोभिकरण, सौंदर्यीकरण करणे संबंधाने केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी यांचे कडे बैठक लावून वरील प्रश्न मार्गी लावण्यासंबंधी निवेदन माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी दिले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top