बल्लारपुर -
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक गुन्हेगारी शहर म्हणून बल्लारपूर शहराची ओळख झाली आहे. पोलिसांनी गुन्हेगारी वृत्तीवर नियंत्रण मिळण्यासाठी अनेक प्रयत्न सुद्धा केलेत व आताही करत आहे. गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता गुन्हेगारी प्रवृत्ती पार्श्वभूमी असलेल्या 15 गुन्हेगारांना जिल्हा पोलिस प्रशासनाने तडीपार करण्याचा निर्णय जारी केला आहे.
यामध्ये 29 वर्षीय येदुराज उर्फ बच्ची रामनरेश आरक, रा. सुभाष वार्ड बल्लारपूर याला चंद्रपूर जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता तडीपार, 32 वर्षीय मंगेश दशरथ बावणे, श्रीराम वार्ड बल्लारपूर, चंद्रपूर जिल्ह्यातून 2 वर्षासाठी, 20 वर्षीय राजू उर्फ गोलू राजू बोहरिया, सुभाष वार्ड बल्लारपूर, 2 वर्षे चंद्रपूर जिल्हा, 27 वर्षीय प्रकाश उर्फ बंटी प्रेमलाल ठाकूर, टिळक वार्ड बल्लारपूर, चंद्रपूर जिल्हा 2 वर्षे, 23 वर्षीय किशन देशराज सूर्यवंशी, टिळक वार्ड 2 वर्षे चंद्रपूर जिल्हा, 30 वर्षीय अनवर शेख अब्बास शेख, आंबेडकर वार्ड, चंद्रपूर जिल्हा 2 वर्षे, 36 वर्षीय पुनमदास प्रेमदास मुन, राजेंद्र प्रसाद वार्ड, 2 वर्षे चंद्रपूर जिल्हा, 30 वर्षीय रोशन रामप्रसाद पाल, संतोषी माता वार्ड, याला चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ व नागपूर या 4 जिल्ह्यातून 2 वर्षासाठी, 23 वर्षीय दीपक उर्फ रिंकू कोमल चव्हाण, महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपूर, चंद्रपूर, राजुरा, गोंडपीपरी व पोंभुर्णा या 5 तालुक्यातून 1 वर्षासाठी, 31 वर्षीय अमरदीप अशोक तेलंग, मौलाना आझाद वार्ड, बल्लारपूर, चंद्रपूर, राजुरा, गोंडपीपरी व पोंभुर्णा या 5 तालुक्यातून सहा महिन्यासाठी, 31 वर्षीय दर्शन अशोक तेलंग, मौलाना आझाद वार्ड, बल्लारपूर, चंद्रपूर, राजुरा, गोंडपिपरी व पोंभुर्णा या 5 तालुक्यातून सहा महिन्यासाठी, 22 वर्षीय शाहरुख शेरखान पठाण, मौलाना आझाद वार्ड, चंद्रपूर जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी, 21 वर्षीय अनिकेत मोहन गायकवाड, रवींद्र नगर वार्ड बल्लारपूर, चंद्रपूर जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी, 19 वर्षीय साहिल मोहन सिंगलवार, रवींद्र नगर वार्ड, चंद्रपूर जिल्हा सहा महिन्यासाठी व 23 वर्षीय मल्लेश ओदेलु दरपेल्ली याला बल्लारपूर, चंद्रपूर, राजुरा, गोंडपिपरी व पोंभुर्णा या 5 तालुक्यातून सहा महिन्यासाठी तडीपार करण्यात आले आहे.
यापैकी 9 जणांना तडीपारीचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयातून तर उर्वरित 6 जणांचे आदेश हे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयातर्फे जारी करण्यात आले आहे. यापैकी सदरील कुणीही व्यक्ती बल्लारपूर शहरात कुणालाही दिसून आल्यास त्यांनी तात्काळ बल्लारपूर पोलीस स्टेशन क्रमांक 07172-240327 किंवा पोलीस निरीक्षक बल्लारपूर उमेश पाटील मोबा. क्रमांक - 9822511751 यावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.