- संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न
- व्हायरल होणार्या त्या क्लिपची पडताळणी करून दोषींवर कारवाई करण्याची कार्याध्यक्ष संजय वासाडे यांची मागणी
चंद्रपूर -
बल्लारपूर इन्स्टिटय़ुट ऑफ़ टेक्नॉलॉजी च्या प्राचार्य व एका प्राध्यापकाने आपल्यावर टाकुन मारण्याची धमकी दिल्याची तक्रार एका महिला प्राध्यापिकेने केल्यानंतर जिल्ह्यातील शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असुन ह्या संदर्भात मागील जवळपास आठवडाभरापासून एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असुन त्या महिला प्राध्यापिकेने केलेले आरोप अत्यंत गंभीर असल्यामुळे संस्थेविरोधात संशयाचे वलय निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रपूर प्रेस क्लब येथे संस्थेचे कार्याध्यक्ष संजय वासाडे ह्यांनी जवळपास 100 कर्मचाऱ्यांसह पत्रकार परिषद घेऊन महिला प्राध्यापिकेने लावलेल्या आरोपांचे खंडन केले आहे.
सविस्तर वृत्त असे की, काही महिन्यांपासून बल्लारपूर इन्स्टिटय़ुट ऑफ़ टेक्नॉलॉजी ही संस्था सतत वादाच्या भोवऱ्यात अडकली असुन कर्मचाऱ्यांचे पगार, भविष्यनिर्वाह निधीची अफरातफर, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रकरण तसेच संस्थेच्या मान्यतेबद्दल शासनाने निर्गमित केलेले आदेश ईत्यादी प्रकरणे ताजी असतानाच संस्थेतील एका महिला प्राध्यापिकेने अत्यंत गंभीर आरोप केल्याने खळबळ माजली आहे.
त्या आरोपांवर आपली बाजु मांडताना संस्थेचे कार्याध्यक्ष संजय वासाडे ह्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, त्यांच्या संस्थेद्वारा संचालित बल्लारपूर इस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील एका घटनेचा विपर्यास करून काही विघ्नसंतोषी लोकांच्या चिथावणीवरून आणि सक्रीय सहभागाने प्रसार माध्यमांमार्फत मागील काही दिवसांपासून संस्थेच्या आणि प्राचार्याच्या बदनामीचे सत्र सुरु करण्यात आले आहे.
संस्थेने स्वतःच्या स्तरावरून केलेल्या चौकशीत असे लक्षात आले की, दि. ०७.१०.२०२१ रोजी बीआयटी च्या संचालकांकडे एका प्राध्यापिकेने एक अर्ज केला ज्यात त्यांचे म्हणणे होते की दि. ०६.१०.२०२१ रोजी अभियांत्रिकी कॉलेजचे प्राचार्य मिश्रा आणि पॉलिटेक्निकचे प्राचार्य गोजे ह्यांनी आपल्याला अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसमोर मोठमोठ्याने विचारपूस केली आणि अपमान केला तसेच सदर प्राध्यापिका विद्यार्थ्यांना भडकवित असल्याचा आरोप दोघांनीही लावला आणि हे सर्व तिच्या आणि प्राचार्याच्या पदाला शोभेनासे होते. त्यावेळी उपस्थित इतर कर्मचाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी देखील वरप्रमाणे घटना घडल्याबाबत दुजोरा दिला. याबाबत दोन्ही प्राचार्यांनी देखील खुलासा दिला. सर्वांचेच म्हणणे मिळतेजुळते होते. झालेल्या घटनेबाबत दोन्ही प्राचार्यांनी दिलगिरी व्यक्त केली. सदर प्राध्यापिकेच्या विनंतीवरून आम्ही त्या अर्जाची प्रत बल्लारशहा पोलिस स्टेशनला पाठविली असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सदर प्राध्यापिकेला कोणीही स्पर्श केल्याबाबत किंवा अश्लील शब्द वापरल्याबाबत आमच्याकडे कोणतीही तक्रार आली नाही. तशी तक्रार असल्यास कामाच्या ठिकाणावर महिलांच्या छळवणुकीबाबतच्या समितीमार्फत निश्चित चौकशी करण्यात येईल असे संजय वासाडे ह्यांनी स्पष्ट केले.
परंतु सदर प्राध्यापिकेने आपल्या तक्रारींचे स्वरूप आणि त्यात वेळोवेळी करण्यात येत असलेले बदल संशयास्पद असुन त्यांनी केलेल्या आरोपांच्या सत्यतेबाबत शंका येण्यास भरपूर वाव असून काही महाभागांच्या चिथावणीकरून हा प्रकार होत असल्याचे जाणवते. चौकशीअंती सत्य बाहेर येईलच, कालपासून व्हायरल होत असलेल्या ऑडियो आणि व्हिडिओ च्या प्रस्तुतीकरणावरून ते बनावटी असावेत असे लक्षात येते की ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्याबाबत देखील पोलिसांनी चौकशी करावी आणि संस्थेची बदनामी करणान्या समाजकंटकांविरुद्ध कारवाई करावी अशी मागणी कार्याध्यक्ष यांनी जवळपास 100 कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.