- मिरवणूक काढण्यास व DJ ला यावर्षी सुद्धा बंदी
- पोलीस स्टेशन गडचांदूर येथे शांतता कमेटीची सभा संपन्न
गडचांदूर -
कोरोना चे सावट अजूनही गेले नाहीत तेव्हा पोळा, गणेशोत्सव आदि सण अतिशय साधेपणाने, कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत साजरे करावे असे आवाहन नवनियुक्त पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी शनिवारी पोलीस स्टेशन गडचांदूर येथे आयोजित करण्यात आलेल्या शांतता कमिटी च्या सभेत केले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ने 4 फूट व घरगुती साठी 2 फूट उंचीची मूर्ती स्थापन करावी, मिरवणूक काढण्यास व डी.जे. ला यावर्षी सुद्धा बंदी असून कार्यक्रम स्थळी गर्दी होणार नाहीत याची काळजी मंडळांनी घ्यावी असे आवाहन केले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज, व्हिडिओ व्हायरल करून शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. याप्रसंगी शांतता कमिटी चे सदस्य हंसराज चौधरी, मनोज भोजेकर, माजी न,प, उपाध्यक्ष सचिन भोयर, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, विक्रम येरणे, रामसेवक मोरे, रोहन काकडे, रोहित शिंगाडे, महेंद्र ताकसांडे, विठ्ठलराव थिपे, सतीश उपलेंचवार, राहूल उमरे, तथा पत्रकार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध गणेशोत्सव मंडळ चे पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या आयोजनासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी, धर्मराज मुंढे, सुषमा आडकीने तथा इतरांनी सहकार्य केले.
Advertisement
Related Posts
- गडचांदूरमध्ये शिवसेना (शिंदे) गटाचे पॉवर शो09 Nov 20250
शिवसेना (शिंदे) गटात प्रतिष्ठित व्यापारी धनंजय छाजेड़शहरात राजकीय भूकंप, सर्व पक्षांचे गणित कोलमडलंआम...Read more »
- दिवाली स्नेह मिलण री रंगत, राजस्थानी समाज एक दूजे सूं जुड़ा07 Nov 20250
राजस्थानी समाज री शान, वरिष्ठ महानुभावां रो सत्कारगीत, सत्कार और संस्कार सूं सतरंगी बन्यो मिलण-समारो...Read more »
- “महाकाली महोत्सवात भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाची एकत्रित मेजवानी”27 Sep 20250
“गडचांदूरच्या रस्त्यांवर महिलांचा भक्तिभावाने उमटलेला सहभाग”“999 महिला भक्तांचा गौरव – भक्तिरसाचा अव...Read more »
- सीमावर्ती भागातील जुगार अड्ड्यांवर कारवाईची मागणी26 Sep 20250
शिवसेना जिल्हा प्रमुख बंडू हजारे यांचे पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांच्याकडे निवेदनआमचा विदर्भ - द...Read more »
- गडचांदूरात उत्साहात पार पडला वाहन चालक दिन18 Sep 20250
अनैशा वाहन चालक कामगार संघटनेचा पुढाकारआमचा विदर्भ - दीपक शर्मागडचांदूर (दि. १८ सप्टेंबर २०२५) -&nbs...Read more »
- गडचांदूर भाजप शहर मंडळाची नवी कार्यकारिणी जाहीर08 Sep 20250
अध्यक्ष अरविंद डोहे यांच्या हस्ते भाजप पदाधिकाऱ्यांची घोषणाआमचा विदर्भ - दीपक शर्मागडचांदूर (दि. ०८ ...Read more »
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)












टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.
EmoticonClick to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.