जिवती -
जिवती येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहात आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक वितरण व्यवस्था, दक्षता समिती व अन्य विभागातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या प्रसंगी आमदार सुभाष धोटे यांनी अन्न पुरवठा विभाग, रास्तभव दुकादार व ग्राहक यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे आहे. गोर गरीब जनतेला रास्तभाव दुकानदार यांनी योग्य सहकार्य करावे. येणाऱ्या अडचणींचे निरसन करून नागरिकांना सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी पाऊल उचलण्यात यावीत अशा अनेक महत्त्वपूर्ण सुचना केल्या.
याप्रसंगी प.स. सभापती अंजनाताई पवार, माजी जि. सदस्य भिमराव पाटील मडावी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणपत आडे, माजी उपसभापती सुग्रीव गोतावळे, सिताराम कोडापे, दक्षता समिती सदस्य सत्तरशाह कोटनाके, जयश्री गोतावळे, कांता श्रीसागर, रखमाबाई राठोड, शामराव गेडाम, सवित्रा गोटमवार, कलीम शेख, तहसीलदार ए.बी. गांगुर्डे, मुख्यधिकरी कविता गायकवाड, पुरवठा अधिकारी निरीक्षक सविता गंभीर, सहायक निरीक्षक प्रमोद मेश्राम, तालुका युवक अध्यक्ष सिताराम मडावी, बालाजी गोटमवार, रास्तभाव दुकानदार, नागरीक उस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.