Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सत्तेचा दुरुपयोग करुन मनपातील साताधाऱ्यानी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करु नये - कलाकार मल्लारप
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
यंग चांदा ब्रिगेडच्या आंदोलनाचे होर्डिंग काढण्याचा मनपाचा प्रयत्न शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी  चंद्रपूर - मनपातील भ्रष्टाराचा विरोधात ...
  • यंग चांदा ब्रिगेडच्या आंदोलनाचे होर्डिंग काढण्याचा मनपाचा प्रयत्न
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी 
चंद्रपूर -
मनपातील भ्रष्टाराचा विरोधात येत्या 9 आगस्टला यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा समोर चार एक्के दे धक्के हे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे होर्डिंग रितसर परवाणगी घेवून शहरात लावण्यात आले आहे. मात्र मनपातील सत्ताधा-यांनी हे आंदोलन दडपण्यासाठी सत्तेचा दुरुउपयोग करत शहरातील होर्डिंग काढण्याचा प्रयत्न केला आहे. मनपाच्या या कार्यवाहीला यंग चांदा ब्रिगेडने विरोध केला असून मनपातील सत्ताधा-यांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करु नये असा आरोप यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कलाकार मल्लारप यांनी दिला आहे.
मनपात भष्ट्राचाराने कळस गाठला आहे. या विरोधात यंग चांदा ब्रिगेड आक्रमक झाली असून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपातील भष्ट्राचारा विरोधात आंदोलनाची शृंखला सुरु करण्यात येणार आहे. याचाच भाग म्हणून सोमवारी 9 आॅगस्टला मनपा समोर यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने चार एक्के दे धक्के हे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी आंदोलनाचे होर्डिंग लावण्यात आले आहे. हे होर्डिंग सध्या शहर वासीयांचे लक्ष वेधत आहे. मात्र आता मनपातील सत्ताधा-यांनी सदर आंदोलन दडपण्याच्या हेतूने शहरात लागलेले होर्डिंग काढण्याचा प्रयत्न चालविला आहे. दरम्याण छोटा बाजार चौकात लागलेला होर्डिग काढण्यासाठी गेलेल्या मनपाच्या पथकाला यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचा रोष पहाता मनपाचे पथक होर्डिंग न काढता परतले. या प्रकारानंतर मनपातील भष्ट्राचारा विरोधात करण्यात येणार असलेले आंदोलन  सत्याधारी सत्तेचा दुरुउपयोग करत दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 








Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top