- भाजपा कार्यकर्ते अजय बंदूरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य
- कृषी व पशुसंवर्धन सभापती जिप चंद्रपूर यांच्या
राजुरा -
दिनांक 29 ऑगस्ट ला भाजपा कार्यकर्ते अजय बंदूरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कृषी व पशुसंवर्धन सभापती जिप चंद्रपूर यांच्या पुढाकाराने गोवरी येथे 172 पूरग्रस्त कुटुंबांना ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
22 जुलै ला झालेल्या अतिवृष्टीमुळे गोवरी गावातील 172 घरामध्ये पाणी शिरून अन्नधान्य व इतर सामग्रीचे अतोनात नुकसान झाले ते सर्व कुटुंब शासनाकडे मदतीचा आशेने पाहत असून अजूनही कोणतीच शासनाकडून मदत मिळालेली नसल्याने अशा परिस्थितीत कृषी सभापती यांच्या पुढाकारातून एका सामान्य कार्यकर्ता अजय बंदूरकर यांच्या वाढदिवसाचे निमित्य साधून सर्वच 172 कुटुंबांना काहीतरी मदत म्हणून ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शंकर बोढे, ग्रास सिद्धार्थ कास्वटे, अनिल मालेकर, प्रभाकर काळे, संबाशीव जुनघरे, नामदेव उरकुडे, अविनाश उरकुडे, तंटा मुक्ती अध्यक्ष गोपीनाथ जमदाडे, विलास लोहे, ज्ञानेश्वर मशारकर, भास्कर वनकर, विनोद वांढरे, मार्कंडी लांडे, दिनेश घागरगुंडे, नथु चिंचोळकर, विठ्ठल चिंचोळकर तथा शेकडो युवा कार्यकर्ता उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.