Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: राजकला टॉकीजचे पार्टनर संजय बुरडकर यांचे दुःखद निधन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - सिनेमा हा तर आबालवृद्धां सोबतच सर्वांचा आवडीचा, आकर्षणाचा विषय. ज्या चित्रपटगृहांत ते दाखवले जा...
शशी ठक्कर - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
सिनेमा हा तर आबालवृद्धां सोबतच सर्वांचा आवडीचा, आकर्षणाचा विषय. ज्या चित्रपटगृहांत ते दाखवले जातात, त्यांच्याबद्दलही प्रेम निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. जिल्ह्यातील सर्वात उत्तम चित्रपटगृहापैकी एक राजकला टॉकीज आताचे सिनेप्लेक्स चे पार्टनर संजय बुरडकर (वय अंदाजे ५०) यांचे आज दुःखद निधन झाले. संजय बुरडकर अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या मागे दोन बंधू, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मनोरंजन, उद्योग व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली.
टीम आमचा विदर्भ कडूनही संजूभाऊला भावपूर्ण श्रद्धांजली.....

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top