Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात युवक काँग्रेसचे आक्रोश आंदोलन!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी बल्लारपूर - युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशनुसार व पूर्व.खा.नरेश पुगलिया च्या मार्गदर्शन...

रमेश निषाद - आमचा विदर्भ प्रतिनिधी
बल्लारपूर -
युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आदेशनुसार व पूर्व.खा.नरेश पुगलिया च्या मार्गदर्शनाथ व युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष करन पुगलिया यांच्या नेतृत्वात युवक बल्लारपुर अध्यक्ष चेतन गेडाम ने पेट्रोल पंपवर जाऊं निर्धष केले.२०१४ पासून देशाची सत्तासुत्रे हाती घेतलेल्या मोदी सरकार ने महागाई वर कुठलेच नियंत्रण न ठेवल्याने पेट्रोल डीझलच्या किमतीत प्रचंड वाढ झाली.त्याचा मोठा परिणाम दळण वळणावर झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही गगनाला भिडल्या. या महागाईने नागरिकांना आर्थिक विवंचनेत टाकले असतांनाच पेट्रोल दरवाढीचा भडका उडाला. पर्यायाने पेट्रोल दरवाढी ने नाबाद सेंच्युरी ठोकली.केंद्रातील मोदी सरकारचे या महागाईवर नियंत्रण नसल्यानेच नागरिकांचे बेहाल झाल्याने या मूक-बधिर केंद्र सरकारला जाग येण्यासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील युथ काँग्रेस ने आज आक्रोश आंदोलन केले. पेट्रोलपंप जवळ मोदी सरकार विरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करत हे आक्रोश आंदोलन केले

युथ काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात युथ काँग्रेस चे पदाधिकारी सिकंदर खान, शंकर महाकाली, अजहर खान, संदीप नाक्षिणे, चंचल मून, सोहेल खान, संजीव सुददाला,तपन उगले,श्रीकांत गुजरकर, राहुल घुंगरूळ, अक्षय वाढरे, साहिल शेख, रोशन ढेगळे, तिरुपति दासरी, अक्षय पप्पुलवार इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top