- १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल जप्त
यवतमाळ -
झरी तालुक्यातील पैनगंगा नदीतून रेतीचा उपसा करून तेलंगाणामध्ये तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना सोमवारी पाटण पोलिसांनी अटक केली आहे. १८ हजारांची रेती व १२ लाखांचे तीन ट्रॅक्टर असा १२ लाख १८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
रविवारी पहाटे पाटण पोलिस स्टेशनच्या ठाणेदार संगीता हेलांडे यांना पैनगंगेच्या पात्रातून रेतीचा उपसा करून तेलंगाणामध्ये तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर हेलांडे दुर्भा येथील पैनगंगेच्या पात्रात पथकासह पोहचल्या. पात्रातून तीन ट्रॅक्टर रेती भरून तेलंगणमधील आदिलाबाद जिल्ह्यात जात असलेली आढळून आली. पोलिसांनी ट्रॅक्टर थांबवून रेती वाहतुकीचा परवाना व रॉयल्टीबाबत विचारणा केली असता तीनही ट्रॅक्टरचालकांजवळ वाहतुकीचा परवाना किंवा रॉयल्टीचे कागद आढळून आले नाही. त्यामुळे चालक श्यामसुंदर संभाजी जाधव (वय २३), योगेश्वर श्रीरंग जाधव (वय २३) व मनाराजी रामराव मारनूर (वय ३६) तिघेही राहणार जुनी तालुका इचोडा (आदिलाबाद) यांच्यावर भादंविच्या कलम ३७९, १८८ प्रमाणे गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. सोबतच तीनही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.