- कुठे मिळेल अर्ज ; कुठे संपर्क साधावा वाचा सविस्तर....
चंद्रपूर -
आदिवासी समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्टय़ा अति मागासलेला असून प्रतिकूल परिस्थितीमुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने शासन निर्णय 31 मार्च 2005,दि.11 एप्रिल 2012 व 16 मार्च 2016 अन्वये राज्यातील अनुसूचित जमातीच्या 10 विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी दि. 30 जून 2021 पुर्वी अर्ज करावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे, प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.
या ठिकाणी मिळेल अर्ज:
परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज जवळच्या एकलव्य रेसिडेंशियल स्कूल, शासकीय आश्रम शाळा संलग्न कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तसेच प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,चंद्रपुर या ठिकाणी उपलब्ध आहेत.
येथे साधा संपर्क:
विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, प्रशासकीय भवन,पहिला माळा, चंद्रपूर येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.