- 24 तासात बाधितांपेक्षा बरे होणारे 521 ने जास्त
- 710 पॉझेटिव्ह, 1231 कोरोनामुक्त, जिल्ह्याबाहेरील पाच मृत्युसह 27 मृत्यु
- पुढील आदेशापर्यंत केवळ 45 वर्षांवरील नागरिकांसाठी दुसरा डोजसाठी लसी वापरण्याला प्राधान्य
गत 24 तासात जिल्ह्यात 710 जण पॉझेटिव्ह आले असून 1231 जण कोरोनामुक्त झाले. तसेच जिल्ह्याबाहेरील पाच मृत्युसह जिल्ह्यात एकूण 27 मृत्युची नोंद झाली. यात दोन नांदेड येथील, दोन वाशिम येथील तर एक मृत्यु चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.
जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 8079 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 710 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 7369 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 6164 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2511 तर गृह विलगीकरणात 3653 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 65138 झाली आहे. 24 तासात 1231 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 57405 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1569 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.02, मृत्युदर 2.41 आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 81, 66, 71, 50, 50 वर्षीय महिला व 60, 77,70 वर्षीय पुरुष, कळंब शहरातील 80 वर्षीय तर तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील 57 वर्षीय महिला, दिग्रस येथील 78 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 60 वर्षीय महिला, वणी तालुक्यातील 85 वर्षीय पुरुष, राळेगाव तालुक्यातील 72 वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील 59 वर्षीय पुरुष, मारेगाव तालुक्यातील 60, 54 वर्षीय पुरुष, झरीजामणी तालुक्यातील 57 वर्षीय महिला, जिल्ह्याबाहेरील नांदेड येथील 77 वर्षीय पुरुष व 85 वर्षीय महिला, चंद्रपूर येथील 50 वर्षीय पुरुष आहे.
जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यामध्ये पांढरकवडा येथील 80 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये वणी येथील 81 वर्षीय पुरुष, मारेगाव येथील 60 वर्षीय पुरुष आणि वाशिम येथील 52 व 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बुधवारी पॉझेटिव्ह आलेल्या 710 जणांमध्ये 447 पुरुष आणि 263 महिला आहेत. यात वणी येथील 77 पॉझेटिव्ह रुग्ण, यवतमाळ 84, पांढरकवडा 91, पुसद 56, घाटंजी 65, दिग्रस 34, झरीजामणी 2, बाभुळगाव 9, दारव्हा 88, नेर 48, आर्णि 17, राळेगाव 38, मारेगाव 25, उमरखेड 34, कळंब 17, महागाव 15 आणि इतर शहरातील 10 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 500279 नमुने पाठविले असून यापैकी 497677 प्राप्त तर 2602 अप्राप्त आहेत. तसेच 432539 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.
पुढील आदेशापर्यंत केवळ 45 वर्षांवरील नागरिकांसाठी दुसरा डोजसाठी लसी वापरण्याला प्राधान्य : लसीकरण मोहिमेंतर्गत 45 वर्षांवरील बहुतांश नागरिकांचा दुसरा डोज बाकी आहे. त्यामुळे यापुढे आता प्रत्येक केंद्रावर केवळ दुस-या डोजचेच लसीकरण करण्यात येईल. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा टास्क फोर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशिल्ड चा दुसरा डोज नागरिकांना देण्याच्या सुचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या आहेत. पहिला डोज घेतलेल्या व दुस-या डोजसाठी पात्र असलेल्या नागरिकांची केंद्रनिहाय संख्या तयार करून त्या केंद्रावर दुस-या डोजसाठी लस प्राप्त होईल, याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे. तसेच शासनाच्या सुचनेनुसार पुढील आदेशापर्यंत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात येईल. लसीकरण केंद्रावर टोकन पध्दत परिणामकारक पध्दतीने राबवावी. जेणेकरून गर्दी होणार नाही व नियमांचे पालन करून लसीकरण सुरळीत सुरू राहील. उपलब्ध होणा-या लसीचा उपयोग हा दुस-या डोजसाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी चिंता करू नये तसेच यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात 318516 जणांचे लसीकरण झाले असून मंगळवारी 19487 जणांना लस देण्यात आली. बुधवारी जिल्ह्याला 12500 लस मिळाल्या. जिल्ह्याला लसींचा साठा उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा सुरू असून यापुढे गतीने लसीकरण करण्यात येणार आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 742 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सात डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 30 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 742 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 408 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 169 बेड शिल्लक, सात डीसीएचसीमध्ये एकूण 406 बेडपैकी 169 रुग्णांसाठी उपयोगात, 183 बेड शिल्लक आणि 30 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 709 उपयोगात तर 390 बेड शिल्लक आहेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.