- दुसऱ्या लाटेत करोना संसर्गाचे हॉटस्पॉट ठरलेल्या नागपुरात म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराची धास्ती
- नागपुरात गेल्या २४ तासांत २ जणांचा मृत्यू
- आजारामुळं ८ जणांनी गमावली दृष्टी
नागपूर -
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेतून शहर सावण्याची शक्यता धुसर होत आहे. ज्यांना कोव्हिडची लागण होऊन गेलेली आहे, अशा रुग्णांमध्येही पोस्ट कोव्हिड म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाचाही फास आवळत जातोय.
गेल्या २४ तासांत या बुरशीजन्य आजाराने २ जणांना जीव गमवावा लागलाय. तर आतापर्यंत ८ जणांना दृष्टी गमावल्याने कायमचे अंधत्व आले आहे.
म्युकरमायकोसिसमुळे दगावलेल्यांपैकी एक ६० वर्षीय व्यक्तीवर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. तर दुसऱ्याला मेयोत दाखल करण्यात आले होते.
अब्दुल रशीद (वय ६०) असे या म्युकोग्रस्त रुग्णाचा नाव आहे. करोना झाल्यानंतर ते बरे झाले. यानंतर अचानक ९ मे रोजी त्यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. त्यावेळी ते व्हेंटिलेटवर होते. लगेच दोन दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा काल रात्री मृत्यू झाला. २० एप्रिल रोजी अब्दुल रशीद यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार झाले. कोरोनातून ते बरे झाले. मात्र त्यांचं डोकं दुखत होतं. उजव्या डोळ्यांजवळ सुज आली होती. त्यांना व्हेंटिलेटवरच असताना मेडिकलमध्ये आणले. दोन दिवसात त्यांचा मृत्यू झाला. याला येथील वरिष्ठ डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे.
सध्याच्या स्थितीत मेडिकलमध्ये १० तर मेयोत ११ जण म्युको मायकोसिस वरील उपचारााठी भरती आहेत. या रुग्णांमध्ये हृदय, फुफ्फुसं, मूत्रपिंडं, मेंदू अशा महत्त्वाच्या अवयवांच्या कार्याशी निगडीत अनेक शारीरिक व्याधी उद्भवत असल्याचं लक्षात आलं आहे. मेयोत ११ बुरशीजन्य आजाराच्या रुग्णांपैकी ६ पुरुष तर ५ महिला आहेत. यातील चार जणांवर शस्त्रक्रियाही झाली आहे.
पूर्वी हा आजार'ब्लॅक फंगस' वा 'काळी बुरशी' या नावानं ओळखला जायचा. आजपर्यंत तसा हा आजार दुर्मिळ गटात गणला जायचा. उपचारादरम्यान स्टिरॉईड, प्रतिजैविकांच्या माऱ्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी झाल्यानंतर याचे संक्रमण होण्याच्या जोखीम बळावते.डॉ. प्रशांत पाटील, विभागप्रमुख, मेडिकल
पोस्ट कोविडच्या काही रुग्णांना दातांची, काहींना नाकाचीही समस्या दिसून येतेय. म्युकरमायकोसिसची सुरुवात नाकात सायनसपासून सुरू होते. ही बुरशी हळूहळू मेंदूपर्यंत पोहोचते. मेयोत ११ रुग्ण दाखल आहेत. यातील चार जणांवर शस्त्रक्रिया झाली आहे.डॉ. जीवन वेदी, कान- नाक- घसा विभाग, मेयो
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.