- १७ तासापासून वीजपुरवठा बंद
- वीज पुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांनी रात्र काढली अंधारात
- दिवसातून शेकडोवेळा वीज जाणे नित्याचीच बाब
राजुरा -
१४ मे ला सायंकाळी ५ च्या दरम्यान वाऱ्यासह पाऊस झाला. पाऊस सुरु होताच राजुरा शहर व राजुरा शहराला लागूनच असलेल्या रामपूर परिसरातली वीज पुरवठा खंडित झाला होता. मात्र रात्री उशिरा राजुरा शहरातील वीज पुरवठा सुरु झाला असला तरी सकाळी १० वाजेपर्यंत रामपूर परिसरातला वीज पुरवठा सुरु झाला नव्हता. अजूनही वीज पुरवठा सुरु न झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर दुसरी कडे कोरोना मुळे गृहविलगीकरमुळे घरी असलेल्या बाधितांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावात पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन पुरेश्या प्रमाणात नसल्यामुळे निम्या गावाला बोरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. टंकीतले पाणी संपल्याने व वीजच नसल्याने दैनंदिनी कामकाज बिघडले आहे.
दिवसातून शेकडोवेळा वीज जाणे नित्याचीच बाब
रामपूर परिसरात विजेचा लपंडाव हि नित्याचीच बाब झाली असून वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत; मात्र याकडे विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्रभर वीज गुल होत असल्याने नवीन गेवराई भागातील नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वीज कंपनीचे कर्मचारी फोन उचलत नसल्याने ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. दरम्यान, गेल्या महिन्यापासून उकाडा वाढल्याने नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. मात्र वीजपुरवठा खंडित होत असल्याने त्रस्त नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. वीज वितरण कंपनीने विद्युत पुरवठा सुरळीत करावा, वारंवार वीजपुरवठा का होत आहे यावर तोडगा काढावा एका आठवड्यात वीजपुरवठ्या संबंधी समस्यांचे पूर्णतः निवारण न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्राम पंचायत सदस्य व शिवसेना उपतालुका प्रमुख रमेशभाऊ झाडे व युवासेना उपतालुका प्रमुख बंटीभाऊ मालेकर यांनी दिला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.