- म्युकोर मायकोसिस हा बुरशीजन्य [फंगस] संसर्ग रोग आहे, शक्यतो हा रोग 'म्युकोरेल्स' या फंगस मुळे होतो
नाकाच्या सर्दीवाटे हि बुरशी नाकामध्ये सायनस मध्ये फुफुसामध्ये तोंडामध्ये डोळ्यापासून ते मेंदूपर्यंत पोहचते. या बुरशीच्या संसर्गाचा वेग सर्वाधिक असून उपचारासाठी कमी वेळ मिळतो. लवकर निदान झाले तर औषोधोपचाराने इलाज होऊ शकतो, जर उशीर झाला तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते. डोळ्यांशी संसर्ग पोहचल्यास त्यांना कायम स्वरूपाची इजा होऊ शकते व अंधत्व देखील येऊ शकते. बऱ्याचदा डोळे काढण्याची देखील गरज पडू शकते हा संसर्ग मेंदूपर्यंत पोचल्यास उपचार करणे दुरापास्त होते व रुग्ण दगावू शकतो.
रिक्स फॅक्टर्स- खालील रोग सोबतीला असल्यामुळे म्युकोर मायकोसिस ची लागण लवकर होते हायपरटेन्शन मधुमेह
- हायपरटेन्शन
- मधुमेह
- HIV / AIDS असणे
- कोविड १९ ची उपाययोजना / औषोधोपचार करणे
- जास्त वेळ स्टिरॉईड्स चा वापर करणे
- कँसर
- सिरॉसिस ऑप लिव्हर
- मूत्रपिंड आजार
- लट्ठपणा असणे
निदान करण्यासाठी लक्षणे
- नाक- वारंवार सर्दी होणे
- नाकातून दुर्गंधयुक्त वास येणे
- नाक बंद होऊन श्वास घेण्यास त्रास होणे
- नाकातून काळ्या रंगाची सर्दी वाहने
- सायनस दुखणे, चेहरा सुजणे, सतत ताप येणे
तोंड व घसा
- तोंडाचा दुर्घन्ध येणे
- तोंडातून पस येणे
- दातांची रचना खिळखिळी होऊन दात ठिसूळ होणे व पडणे दातांची जखम न भरणे
- डोळे दुखणे
- डोळ्यांची कमी दिसणे
- डोळे सुजणे
- डोके दुखणे
- मेंदूच्या नसांचा त्रास होणे
- मेंदू अकार्यक्षम होणे
- सतत खोकला असणे
- दम लागणे
- रक्ताच्या उलट्या होणे
- नाकाची दुर्बिणीद्वारे तपासणी
- पॅथॉलॉजिकल लॅब तपासण्या, रक्त तपासणी आवश्यकता असल्यास [मेंदूतील द्रव तपासणी]
- रेडिमोलॉजिकल
नाकाचा एक्सरे PNS [Para Nosal Sinus]
- CT PNS
- मेंदू चा MRI
- बायोप्सी [Biopsy]
- नाकाच्या दुर्बीण द्वारे बुरशीचा तुकडा घेऊन ची Biopsy तपासणी करणे
- ENT सर्जन
- नेत्र रोग तज्ज्ञ
- दंत रोग तज्ज्ञ
- मॅक्सिल फेशिअल सर्जन
- इंजेक्शन -अँफोटेरीसिन बी डॉक्सीक्लोरेट [Amphootericin B Doxychlorate]
- इंजेक्शन - लायपोसोमंल अँफोटेरिसीन बी
- इंजेक्शन - अँफोटेरिसीन बी लिपिड कॉम्प्लेक्स
या म्युकोर मायकोसिस आजाराचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. प्रामुख्याने कोरोना रुग्णांवर उपचार करतांना आवश्यकतेनुसार अत्यल्प प्रमाणात स्टिरॉइडचा वापर करणे गरजेचे आहे. प्रामुख्याने हायरिस्क असलेल्या रुग्णांमध्ये हा संसर्ग असल्यास धोका जास्त आहे, आणि म्हणूनच कोरोनाच्या उपचार दरम्यान अँटी फंगल च्या औषधांच्या वापर करणे आवश्यक आहे.
कोरोनाचे संकट मोठे आहे मात्र त्यानंतर सुद्धा या बुरशीजन्य आजाराच्या मध्यमातून रुग्णांच्या जीवाला धोका आहे आणि म्हणूनच कोविड नंतर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करून आवश्यकतेनुसार म्युकोर मायकोसिस या रोगाचा उपचार करून घेणे हि काळाची गरज आहे.

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.