राजुरा -
वनविभागाकडून राबविण्यात असलेले तेंदूपत्ता संकलन सन 2019 ते 2020 या हंगामातील रखडलेले तेंदूपत्ता बोनस राजुरा वनविभागातील विहिरगाव परिक्षेत्रात मजुरांना आजपर्यंत वितरित करण्यात आलेले नाही.
करिता सध्या मजुरांना कोणतेही मजुरीचे काम नसून कोरोना काळात त्यांचे जीवन हलाखीचे होत आहे. मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली असून यथाशिग्र थकीत तेंदूपत्ता बोनस मिळाल्यास त्यांना सोयीचे होईल करीता तात्काळ दखल घेऊन गोरगरीब मजुरांना तेंदुपत्ता बोनस तातडीने देण्यात यावा अशी मागणी विहिरगाव ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच इर्शाद शेख यांनी आमदार सुभाष धोटे यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
सध्या परिस्थितीत सर्वत्र कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत असून शासनाने लाकडाऊन लावलेला आहे. अशा स्थितीत अनेकांच्या घरातील आर्थिक बजेट कोलमडून पडले आहेत. सदर परिस्थिती लक्षात घेऊन या वनपरीक्षेत्रातील मजुरांना किमान त्यांच्या हक्काचे बोनस तातडीने उपलब्ध करून दिल्यास तेवढेच त्यांना आधार होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.