Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: 34 बाधीतांचा मृत्यू ; 1511 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 1055 झाले कोरोनामुक्त आजची आकडेवारी, वाचा सविस्तर.... श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी चंद्रपूर - जिल्ह्यात ...

  • चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 1055 झाले कोरोनामुक्त
  • आजची आकडेवारी, वाचा सविस्तर....
श्रावण कुमार - आमचा विदर्भ प्रतिनिधी
चंद्रपूर -
जिल्ह्यात मागील 24 तासात 1055 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1511कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 34 बाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 49 हजार 494 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 34 हजार 579 झाली आहे. सध्या 14 हजार 182 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 49 हजार 36 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 लाख 92 हजार 632 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील गजानन महाराज चौक परिसरातील 72 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय पुरुष, हवेली गार्डन येथील 51 वर्षीय पुरुष, दुर्गापूर येथील 57 वर्षीय महिला, 60 व 65 वर्षीय पुरुष, महाकाली वार्ड येथील 35 वर्षीय पुरुष,55 वर्षीय पुरुष, 92 वर्षीय महिला, भद्रावती तालुक्यातील गुरुदेव नगर येथील 83 वर्षीय पुरुष, बल्लारपूर तालुक्यातील 48 वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील 48 व 60 वर्षीय पुरुष, गोंडपिपरी तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, नागभीड तालुक्यातील 44 वर्षीय व 54 वर्षीय महिला, वरोरा तालुक्यातील 65व 55 वर्षीय पुरुष,

कोरपना तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, गडचांदूर येथील 62 वर्षीय पुरुष, वणी तालुक्यातील 52 वर्षीय पुरुष, चिमूर तालुक्यातील टेकेपार येथील 65 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला, पिंपळनेरी येथील 65 वर्षीय महिला, ब्रह्मपुरी तालुक्यातील 43 वर्षीय महिला, 70 व 73 वर्षीय पुरुष भंडारा येथील 42 वर्षीय पुरुष, तर नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील 36 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 733 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 677, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 25, यवतमाळ 22, भंडारा पाच, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 1511 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 412, चंद्रपूर तालुका 45, बल्लारपूर 158, भद्रावती 138, ब्रम्हपुरी 70, नागभिड 26, सिंदेवाही 92, मूल 80, सावली 30, पोंभूर्णा 10, गोंडपिपरी 34, राजूरा 61, चिमूर 143, वरोरा 118, कोरपना 54, जिवती 27 व इतर ठिकाणच्या 17 रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top