- रुग्णालयातील कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती
जिवती -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने कोरोना रोगावर प्रतिबंध लस लवकर काढण्यात वैज्ञानिक यशस्वी झाले. कोरोना लसीकरणाला संपूर्ण भारतभर सुरुवात झाली असून सध्या ४५ ते ६० वर्ष वयोगटातील सर्वांना लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्वांनी आवर्जून लास घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी जिवती तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे भेटी दरम्यान केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथील दोन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने आरोग्य केंद्रातील कर्मचारी अनुपस्थित होते. कोरोना लसीकरणाला प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण येथे सुरूवात झाली असून जवळपास ६०० लस प्राथमिक आरोग्य केन्द्र पाटण येथे आरोग्य विभागाकडून उपलब्ध झाल्या. मिळालेल्या लसीमधून सर्वच लसीकरण झालेले आहे. तसेच आजच्या तारखेला एकही लस उपलब्ध नव्हती. जिल्हा स्तरावर यासाठी मागणी करण्यात आली आहे असे सांगण्यात आले. तसेच रुग्णालयात एकही रुग्ण भरती नव्हता. रुग्णालयातील संपूर्ण परिसर सॅनिटायजर करून स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यावेळी वैद्यकीय अधिकारी श्रीमती शेडमाके व एएनएम श्रीमती टेकाम उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.