Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: विदर्भात उन्हाचा झपाटा वाढला, चंद्रपुरात सर्वाधिक तापमानाची नोंद
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
कडक निर्बंधामुळे शीतपेय, आईस्क्रीम मिळेना पारंपारिक दही, ताक, लिंबू पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, ज्युस, टरबूजकडे नागरिकांचा वाढला कल विर पुणेक...

  • कडक निर्बंधामुळे शीतपेय, आईस्क्रीम मिळेना
  • पारंपारिक दही, ताक, लिंबू पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, ज्युस, टरबूजकडे नागरिकांचा वाढला कल
विर पुणेकर - आमचा विदर्भ प्रतिनिधी (ग्रामीण)
राजुरा -
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ एप्रिल पासून लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्येही वाढ होत आहे. त्यासोबत विदर्भात आता उन्हाचा तडाखा वाढत आहे. विदर्भातील चंद्रपूरचे तापमान 44.1 अंशावर, तर राजुरा, सास्ती कोळस्याच्या खाणी असल्या मुळे तापमान सर्वाधिक 45.9 वर पोहोचले आहे.

गेल्या आठवड्यात विदर्भातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडला होता. त्यामुळे उष्म्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील शहरांचे व कोळस्याच्या खाणी संलग्न असणाऱ्या गावात तापमान वाढत आहे. पुढील आठवड्यात तापमान आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोरोनामुळे जनता संकटात सापडली आहे. लॉकडाऊनमुळे घरातून बाहेर पडता येत नाही. अशामध्येच आता तापमान वाढत असल्याने गरमी होत आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. उन्हापासून थंडावा देणारी शीतपेयाची दुकानं बंद आहेत. शीतपेयही, आईस्क्रीम मिळत नसल्यामुळे, उन्हाळ्यात शरीराचे तापमान कमी करण्यासाठी पारंपारिक दही, ताक, लिंबू पाणी, उसाचा रस, कोकम सरबत, ज्युस, टरबूजकडे नागरिकांचा वाढला आहे. 





About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top