Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेताला आता सौर ऊर्जेचे कुंपण!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांना वनविभागा तर्फे सौर कुंपण वितरित वन्यप्राण्यांमुळे पिकांची नासाडी होऊ नये आणि शेतकऱ्यांनाही अत्यंत सुरक्षित ठरा...

  • जंगलालगत असलेल्या शेतकऱ्यांना वनविभागा तर्फे सौर कुंपण वितरित
  • वन्यप्राण्यांमुळे पिकांची नासाडी होऊ नये आणि शेतकऱ्यांनाही अत्यंत सुरक्षित ठरावे
कुमारी पोर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -

वन्यप्राण्यांमुळे पिकांची नासाडी होऊ नये आणि शेतक ऱ्यांनाही अत्यंत सुरक्षित ठरावे, असे सौर कुंपण अत्यंत प्रसिद्ध होत आहे. जंगलाला लागून शेत असलेल्या शेतकऱ्यांना रानडुकरे, नीलगाय, हरीण, सांबर यांचा अतिशय त्रास होत आहे. वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे जवळपास ७५ टक्के पिकांचे नुकसान होते. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी शेताला तारेचे कुंपन लावून कृषी मोटारपंपासाठी आलेला वीज पुरवठा अथवा शेतातून गेलेल्या विद्युत वाहिनीतून वीज पुरवठा कुंपणाला जोडतात. यामुळे पाळीव व वन्यप्राण्यांसह मनुष्याचीही जीवितहानी होत आहे. वाघ व बिबटय़ांचा अनेकदा यामुळे मृत्यू झाला आहे. वन्यप्राणी व शेतकऱ्यांची जीवित हानी होणार नाही आणि पिकांचेही रक्षण होईल, असे सौर कुंपणाचे वाटप करण्यात आले. 

पालेबारसा येथे मदत व पुनर्वसमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून शेतकऱ्यांना सौर (solar) उर्जेवरचे कूपन वाटप वनविभागा तर्फे करण्यात आले. जंगलालगत असलेल्या शेतकऱ्याचे रानटी डुकरंकडून खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते असल्याने सावली वनपरिक्षेत्र पाथारी सहाय्यक क्षेत्रातील जंगलालगत असलेल्या गावात 75 % अनुदानावर सोलर कुंपणाचे पालेबारसा येथे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात सावली येथील काँग्रेस कमेटी अध्यक्ष यशवंत बोरकुटे, काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष वैभव गुज्जनवार, वन क्षेत्र सहायक कोडापे साहेब, वनरक्षक राकेश चौधरी, विशाखा शेंडे, कल्याणी पाल, संदीप चुधरी, राजू पाटील वाघरे, दाजगाये, द्रोणाचार्य लोनबले प्रामुख्याने उपस्थित होते. 






Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top