Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: शेतजमीनीच्या सुपीकतेसाठी लेंडी खताला प्राधान्य.......
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतात शेतकऱ्यांचा प्रयोग ; प्रतिदिन 300 रु ; धानाने 3 कुढ़ धान मेंढ़पाळा कडून शेतात शेळयामेढ़याचे बसविले जातात जत्थे कुमारी पोर्णिमा फाले - आमल...

  • शेतात शेतकऱ्यांचा प्रयोग ; प्रतिदिन 300 रु ; धानाने 3 कुढ़ धान
  • मेंढ़पाळा कडून शेतात शेळयामेढ़याचे बसविले जातात जत्थे
कुमारी पोर्णिमा फाले - आमला विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
वेगवेगळ्या प्रकारची कीटकनाशके आणि रासायनिक खताच्या वापराने शेत जमिनीची सुपिकता नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचा विपरीत परिणाम मनुष्य जीवनांवर होतांना दिसत आहे. त्यामुळे माणसाचे आयुष कमी होत असून अल्पावधितच अनेक रोगाची लागन होते. त्यामुळे खानपानावर विशेष महत्व दिले जाते हा भाग धान उत्त्पादनासाठी सदैव अग्रेसर असल्याने धान उत्पादनाला महत्व दिले जात आहे. त्यामुळे धान शेतीची सुपिकता वाढविण्यासाठी मोठ्या उपाय योजना शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. शेळया मेंढीच्या लेंढ़ी खताला प्राधान्य दिले जात आहे. दिवसागनिक पाळीव जनावराचे कमी होणारे प्रमाण आणि गावाजवळ राहणारे शेण खताचे गड़े पाळीव जनावरांच्या कामतरतेमुळे कालबाह्य होत असल्याने शेण खताच्या तूटवळा निर्माण होत असतांना शेण खताची मोठी उणीव भासत आहे. उत्त्पादनात घट येते या उद्देश्याने शेतकरी सेंद्रिय आणि कम्पोस्ट खताचांही वापर करत नाही तर अल्पावधितच आणि कमी कालावधीत भरघोस पिक यावे यासाठी आजच्या शेतकरऱ्याचा कल हा रासायनिक खताकडे असल्याने शेतकरी आपल्या धान पिकावर रासायनिक खताचा सपाटा सुरु केला आहे, परिणामी शेतजमीनीची सुपिकता कमी होताना दिसते सोबतच या भागात धान शेती भोवती कापसाचे सुद्धा पिक घेतले जात असल्याने कापसावरील रोगाचा पादुर्भाव धान पिकावर होत असल्याचे अनेकांचे मत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा जास्त रोगाचा प्रादुर्भाव धान पिकावर होताना दिसतो म्हणूनच धान परे टाकल्या पासुन तर धान पिक हातात येई पर्यन्त पिकावर रासायनिक खत आणि कीटकनाशकाचा मारा केला जात आहे. परिणामी उत्पादनापलीकडे धान पिकाच्या संगोपनाचा खर्च जास्त त्यातही धानाला मातीमोल भाव आदि करनास्ताव आजची धान शेती परवङन्या सारखी नसल्याची सध्या सर्वत्र सुरु आहे. त्यामुळे याभागातील काही शेतकरी कोरिने धान शेती देण्याचे काम करतात धान पिकाचा हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्याच्या दिवसात जमिनीची मशागत केली जाते. सोबतच जमिनीची सुपिकता वाढविण्याच्या दृष्टिने शेतात मेंढ़पाळाकडून शेतात प्रतिदिन 300 रु. आणि धानाने 3 कूढ़ धान या रुपात तीन ते चार खड़ी शेळया मेंढ्यांचे कळप शेतात बसविले जात आहे. तालुक्याच्या अनेक भागात हा प्रयोग प्रति वर्षी शेतकरी करून घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच तालुक्याच्या अनेक भागात शेळया मेंढ्यां चे मोठ-मोठे जत्थे शेतात फिरतांना दिसतात. लेंढी खतातून काही प्रमाणात शेतीच्या सुपिकतेचा मार्ग मोकळा होतो हे मात्र विशेष.....

हा भाग जंगल व्याप्त असल्याने शेळ्या-मेंढ्या साठी पोषक वातावरण असते. सोबतच काही शेतकरी शेतात मेढर बसविण्यासाठी आगाऊ पैसे तसेच धान्य देत असल्याने आमचा दैनंदिनी खर्च भागविला जातो त्यामुळे नेहमी आम्ही या भागात ये असतो.
बुधाजी बिराजी मर्लावार, चांदली - मेढ़पाळ





Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top