राजुरा -
राजुरा तालुक्यातील सास्ती-गौरी जिप सर्कलमधील सास्ती, रामपूर, धोपटाला, धिडशी, माथरा च्या नाल्यातून तसेच वर्धानदीच्या नदी पात्रातून बऱ्याच दिवसापासून खुले आम दिवस-रात्र रेती तस्करी जोमात सुरु असून शासनाच्या कोट्यावधी रुपयाचा महसूल बुडत आहे. या अवैध रेती तस्करीवर संबंधित विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष असून संबंधित विभाग जाणूनबुझून दुर्लक्ष करत आहे आहे अशी ओरड मात्र मात्र जोमात सुरु आहे. संबंधित विभागाने अवैध रेती तस्करीकडे कानाडोळा केल्याने गरजू होत आहे हलाल, मात्र कर्मचारी मालामाल अशी चर्चा मात्र रंगू लागली आहे.
ह्या जिप सर्कल मध्ये वर्धा नदी, नाला, वगर, सास्ती शिवलंन, रामपूर, माथरा अश्या अनेक ठिकाणाहून अवैध रेती रेती तस्करी सुरु आहे. गावातील गरीब लोकांना प्रति 5 ते 6 हजार रुपये मोजावे लागत आहे. गावातील गोर गरीबांना कोरोना काळात घर कामा साठी लागत असलेली रेती एवढ्या चढ्या दराने विकत घ्यावी लागत आहे. या अवैध रेती तस्करीवर आळा बसावा याकरिता भा.ज.यु.मो. चे तालुका अध्यक्ष सचिन शेंडे व शिष्टमंडळा द्वारे तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन देण्यात आले. तात्काळ रेती तस्करीवर आळा न बसल्यास भाजपा युवा मोर्चा गावकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून मोर्चा काढणार असल्याचे मत सचिन शेंडे यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.