- कोरोना व्हायरसची लक्षणे आणि उपाय
- JCI राजुरा प्राईड च्या ऑनलाईन झूम वेबिनार ला उत्स्फूर्त प्रतिसाद
इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपुर चे अध्यक्ष, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल चे कार्यकारी सदस्य, चंद्रपुर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध ईएनटी चिकित्सक डॉ. मंगेशजी गुलवाडे सर यांनी केले. ते जागतिक आरोग्य दिनानिमित्य JCI राजुरा प्राईड द्वारे आयोजित ऑनलाईन झूम वेबिनार मध्ये बोलत होते.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून JCI राजुरा प्राईड ने कोरोना व्हायरसची लक्षणे आणि उपाय या विषयावर ऑनलाईन झूम वेबिनार चे आयोजन केले होते. ता वेबिनार मध्ये डॉ. गुलवाडे पुढे म्हणाले कि, जगभरात करोना व्हायरसनं अक्षरशः थैमान घातले आहे. भारतातही करोना व्हायरस बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना व्हायरस आणि सामान्य तापाच्या लक्षणांमध्ये बरेच साम्य आहे. पण घाबरून जाऊ नका. सरकारी नियम किंवा फॅशन म्हणून मास्क चा वापर करू नका.
नमूद केलेल्या बाबीचे पालन करा -
- - साबण आणि पाण्याने हात स्वच्छ ठेवा
- - शिंकताना नाक आणि तोंडावर रुमाल ठेवा
- - सर्दी, ताप झालेल्यांपासून शक्यतो लांब राहा
- - जंगली किंवा पाळीव प्राण्यांपासून दूर राहा
- - कच्चं किंवा अर्धवट शिजवलेलं मांस खाणं टाळा
- - बाहेर पडताना मास्क घाला
- - नियमित व्यायाम करा
- - खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्या
देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची सुरुवात केली आहे. पण
“लोक अजूनही विचार करत आहेत लस घ्यायला हवी की नको. त्यामुळे या विषयावर जनजागृती करणं महत्त्वाचं झालं आहे." या मोहिमेच्या माध्यमातून लोकांना लस घेण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करण्याचे कार्य जेसिस ने करावे. असेही डॉ. गुलवाडे म्हणाले.
JCI राजुरा प्राईड च्या सदस्या व्यतिरिक्त महाविद्यालयीन विद्यार्थी, आयटीआय विद्यार्थ्यांनी तसेच शेकडो नागरिकांनी ऑनलाईन झूम वेबिनार चा लाभ घेतला. प्रास्ताविक प्राईड चे माजी अध्यक्ष जेसी दीपक शर्मा, आभार प्राईड चे अध्यक्ष जेसी अंकुशसिंह चौहान यांनी केले. यावेळी संस्थापक अध्यक्ष जेसी श्रीगोपाल सारडा, व्यंकटेश गड्डम, श्वेता जयस्वाल, संदीप खोके, सचिव जहीर लखानी प्रामुख्याने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.