कुमारी पोर्णिमा फाले - आमचा विदर्भ तालुका प्रतिनिधी
सावली -
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आदिवासी भागातील मेटेगाव ते सायमारा रस्त्याचे नुकतेच खडीकरण करण्यात आले. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची तक्रार पंचायत समिती सभापती विजय कोरेवार यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद यांचेकडे केली आहे. विशेष म्हणजे अभियंता गायकवाड यांचे देखरेखीखाली कंत्राटदाराने हे पाचवे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत आदिवासी भागातील मेटेगाव ते सायमारा रस्त्याचे नुकतेच खडीकरण करण्यात आले. सदर काम ४३ लक्ष रुपयाचे असून जंगल भागात कोणीही फिरकत नसल्याचा फायदा घेत निकृष्ट दर्जाचे काम केले मात्र सभापती विजय कोरेवार यांनी गावात भेट दिली असता गावकऱ्यांनी सदर काम दाखवत बोगसपणा दाखवून दिला. अंदाजपत्रकाप्रमाणे रस्त्याचे उंचीकरण नाही, गिट्टीचे वेगवेगळे थर नाही, प्रत्येक थरावर पाणी मारून दबाई करण्यात आली नाही. सदर शाखा अभियंता गायकवाड व कंत्राटदार पुल्लूरवार या जोडगोडीचे अनेक कामे निकृष्ट झालेली असतांना फक्त काम सुधारण्यात येते परंतु कारवाई होत नसल्याने राजकिय वरदहस्त लाभलेले असल्याचे दिसते यामुळे कोण काय करतोय या गुर्मीत निकृष्ट दर्जाची कामे शाखा अभियंता व कंत्राटदार यांचे मार्फत केल्या जातात. त्यामुळे या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी सभापती विजय कोरेवार यांनी कार्यकारी अभियंता यांचेकडे केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.