- 9 एप्रिल ला नवी दिल्ली येथे प्रदान होणार
अँड. वामनराव चटप हे गेल्या चाळीस वर्षापासुन राजकिय, सामाजिक, शेती व वकीली क्षेत्रात कार्यरत असून त्यांना सार्वजनिक क्षेत्रात कार्याचा दांडगा अनुभव आहे. आमदार असतांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार त्यांना मिळाला असून ते शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष तथा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष आहेत. अँड. चटप शेतकरी व कष्टकरी जनतेसाठी तसेच स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करणारे लढवय्ये नेते आहेत. नक्षलवादी क्षेत्राचे पंधरा वर्षे आमदार म्हणुन प्रतिनिधित्व करतांना कुठलीही सुरक्षा न घेणारे, सार्वजनिक जीवनात पारदर्शकता व चारित्र्य राखणारे तसेच शेतकर्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे, शेतमालाला रास्त भाव मिळावा आणि तंत्रज्ञान व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी चाळीस वर्षापासुन अव्याहतपणे लढा देत आहेत. अँड. चटप हे दारूबंदीचे कट्टर पुरस्कर्ते असून त्यांच्या विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन आणि जीवनातील पैलूला प्राधान्य देऊन त्यांची या अवॉर्ड साठी निवड करण्यात आली आहे. यापुर्वी महाराष्ट्रातून हा पुरस्कार ख्यातनाम क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि शिक्षणमहर्षी व बिहारचे राज्यपाल डी.वाय.पाटील या दोघांनाच मिळाला होता. विदर्भातून हा सन्मान मिळणारे अँड.चटप हे पहिले व्यक्ती आहेत, हे विशेष.
हा अवॉर्ड दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, मल्टिपरफज हॉल, न्यू बिल्डिंग, मॅक्समुलर मार्ग, लोधी गार्डन, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवरील मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.