Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author We publish the news of Vidarbha level prominently on our website. If you are interested in doing digital journalism then you can join us. We also work for our advertisers to reach their advertisements to thousands of readers every day. any suggestion please message this mobile number 9975977378 email - samarthbharat3@gmail.com
Title: 'वसुलीबाज पत्रकारांचा' खांद्यावर बंदूक ठेऊन निशाणा साधणारा तो 'स्वयंघोषित नेता' कोण?
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
'त्या वसुलीबाज' पत्रकारांचा प्रकरणाला आता धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न काही न्यूज पोर्टल धारकांनी व्यक्त केली दिलगिरी आमचा विदर्भ - ...

'त्या वसुलीबाज' पत्रकारांचा प्रकरणाला आता धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न
काही न्यूज पोर्टल धारकांनी व्यक्त केली दिलगिरी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा द्वारे
गडचांदूर (दि. 11 ऑगस्ट 2023) -
        “पत्रकारिता का एकमात्र लक्ष्य सेवा होना चाहिए। प्रेस एक बड़ी ताकत है, लेकिन जैसे अनियंत्रित जल-प्रवाह में गांव के गांव डूब जाते हैं, फसलें बर्बाद हो जाती हैं, उसी तरह अनियंत्रित लेखनी सेवा करने की बजाए विध्वंस लाने का काम करती है”। - राष्ट्रपिता महात्मा गांधी

        मागील अनेक वर्षांपासून राजुरा विधानसभा क्षेत्रात एकही लहान-सहान उद्योग आलेला नाही. नुकताच ग्रीनफिल्ड विमानतळाचा प्रस्ताव सुद्धा वन सल्लागार समितीने फेटाळला. विधानसभा क्षेत्रात मागील अनेक वर्षांपासून नवीन उद्योगधंदे नसल्याने विधानसभा क्षेत्रातील रोजगाराची व विकासाची संधी हरविली आहे. त्यातही जिल्ह्यातील मोठे उद्योजक आपल्या सोबतच सर्वसामान्य नागरिकांना काही फायदा होऊ शकतो का हा विचार करून त्याकरिता ते गुंतवणूक करून अत्यल्प का होईना मात्र विकासकामाला हातभार लावीत असतात. "स्वयंघोषित नेते" मात्र 'वसुलीबाज पत्रकारांचा' खांद्यावर बंदूक ठेऊन अश्याही प्रकल्पावर व्यत्यय आणतात व नंतर हेच "स्थानीय वसुलीबाज नेते" उद्योगपतींशी 'तोडी' करण्याच्या सतत प्रयत्नात असतात. (The attempt of 'those Vasulibaaz' journalists to give a religious color to the matter)

        नांदा येथे (Yashodhan Vihar) यशोधन विहार या म्हाडाच्या अंतर्गत (PM Infraventure) पीएम इन्फ्राव्हेंचरच्या निवासी प्रकल्पात 1050 घरे बांधली जात आहेत. हा प्रकल्प जिल्ह्यातील सर्वात मोठा निवासी वसाहत म्हणून झळकत असताना मात्र काही स्थानीय स्वयंघोषित नेते, वसुलीबाज पत्रकारांच्या पोटात गुळगुळ होत असून सदर महिला उद्योजक "वसुलीबाज नेत्याला" जुमानत नव्हती परिणामी "स्वयंघोषित नेत्यांनी" आपल्याच पक्षातील मोठ्या नेत्यांना आपले हित साधण्याकरिता दिशाभूल केली होती. (Some news portal owners expressed their apologies)

        मात्र आता "स्थानिक छुटभैय्या नेत्याने" नवीन शक्कल लढवत "वसुलीबाज पत्रकारांना" हाताशी धरून सदर प्रकल्पाची प्रतिमाच समाजमनात मलीन करण्याची रणनीती आखली. त्यात काही "न्यूज पोर्टल चे पत्रकार" अलगद त्यांच्या जाळ्यात आले. "न्यूज पोर्टल" च्या प्रतिमेला कुठेतरी धक्का बसतोय हे बघत काही संज्ञानी पत्रकारांनी यावर लिखाण केले आणि तिथूनच 'त्या वसुलीबाज' पत्रकारांचा बुडाला आग लागायला सुरुवात झाली. प्रथमतः बऱ्याचशा न्यूज पोर्टल धारकांनी निवेदनाचा आधारे कंपनीची प्रतिक्रिया न घेता बातमी कॉपीपेस्ट केली नंतर (aamcha vidarbha) "आमचा विदर्भ" ने याबाबत कंपनीची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला व वेगळीच माहिती समोर आली. ती या आगोदर "आमचा विदर्भ" ने प्रकाशित केली. नंतर काही न्यूज पोर्टल धारकांना सत्यता माहित झाली व लगेच काही "न्यूज पोर्टल" च्या संपादकांनी दिलगिरी व्यक्त करत बातमीही प्रकाशित केली. मात्र काही "न्यूज पोर्टल" ने खोटे बोला पण रेटून बोला म्हणत कंपनीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला परिणामी त्यांना तीन-तीन कोटीच्या नोटिसी  देण्यात आल्या व त्या न्यूज पोर्टलची तक्रार माहिती आणि प्रसारण मंत्रालय नवी दिल्ली, डिजिटल मीडिया विभागाचे उपसचिव श्री अमरेंद्र सिंग यांना करण्यात आली. (Ministry of Information and Broadcasting New Delhi, Division of Digital Media)

        'आम्ही या धर्मातील व समाजाचे' असल्याचे सांगत सदर न्यूज पोर्टल धारक आता प्रकरणाला धार्मिक रंग देण्याच्या प्रयत्न करीत आहे. पण वास्तविक पाहता हे न्यूज पोर्टल धारकांना हे समझत नाही आहे कि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन उच्चवर्णीय 'स्थानीय स्वयंघोषित नेता' स्वतःच्या राजकारणाची पोळी शेकत आहे व वसुलीबाजीच्या थोड्याश्या पैशापायी हे न्यूज पोर्टल धारक देशाचा चौथा आधारस्तंभ व पत्रकारितेतील नीतिमूल्ये गमावत आहे. आम्ही या समाजाचे असल्याने फक्त आम्हालाच नोटीस देण्यात आले असे सदर न्यूज पोर्टल सांगत आहे. मात्र दुसऱ्या न्यूज पोर्टलनी आम्ही प्रतिक्रिया व सत्यता न तपासता बातमी प्रकाशित केली याबद्दल 'दिलगिरी' व्यक्त केल्याने अश्या न्यूज पोर्टलसना नोटीस न दिल्याचे कंपनी प्रतिनिधींनी सांगितले. 

        न्यूज पोर्टल म्हणजे काय? फक्त १४९९ रुपये खर्च कुणीही न्यूज पोर्टल सुरु करू शकतो. 'सायंकाळची सोय आणि होडीशी हरियाली' झळकविली तर वाट्टेल ते कॉपी-पेस्ट करणारे महाभाग उदयास आले. अगोदर पत्रकार दिवाळी आणि वर्धापन दिवसालाच जाहिरात मागायला यायचे मात्र आता उठसूट दे पैशे नाहीतर छापतो बातमी म्हणत एक प्रकारची ब्लॅकमेलिंग सुरु केली आहे. मात्र अश्या न्यूज पोर्टल धारकांनी आपली सतविवेक बुद्धी शाबूत ठेवत आपला कुणी उपयोग तर करून घेत तर राजकारणाची पोळी शेकत तर नाही आहे ना या बाबत चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. (gadchandur)

(जिज्ञासा जागृत ठेवा, माहिती पुन्हा आहे. काही तासाच्या अंतरात......)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top